खरबीवासीयांनी जपली कुस्तीची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:36 IST2021-01-19T04:36:35+5:302021-01-19T04:36:35+5:30
प्रमुख पाहुणे म्हणून खरबीचे उपसरपंच संजय आकरे, गणेश मोथरकर, सुधीर मस्के, शीला जौंजाळ, रंजना मेश्राम, पोलीसपाटील मंजूषा मोथरकर, सुनील ...

खरबीवासीयांनी जपली कुस्तीची परंपरा
प्रमुख पाहुणे म्हणून खरबीचे उपसरपंच संजय आकरे, गणेश मोथरकर, सुधीर मस्के, शीला जौंजाळ, रंजना मेश्राम, पोलीसपाटील मंजूषा मोथरकर, सुनील गिरीपुंजे, दीपाली आकरे उपस्थित होते. स्पर्धेमध्ये १६ संघ सहभागी झाले. यावर्षी कोरोनाचे संकट असले तरी शासकीय नियमाच्या अधीन राहून कोरोना नियमांच्या पालनात यावर्षीही स्पर्धेला खंड पडू देण्यात आला नाही. मारोडी येथील संघास प्रथम क्रमांकाचे दहा हजारांचे बक्षीस तर द्वितीय चमू म्हणून सावली संघाला पाच हजारांचे बक्षीस देण्यात आले. बक्षीस वितरण राजे क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शैलेश मोथरकर व सचिव निलेश मोथरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष निशांत गोस्वामी, सदस्य अमोल जौंजाळ, वृषभ बावनकर, अजय आकरे, सूरज लांजेवार, रोहित मोहतुरे, बबलू मेश्राम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी खरबी ग्रामवासी यांच्या मनोरंजनासाठी संगीत खडा तमाशा व लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.