न्यायालयाच्या आदेशाला दाखविली केराची टोपली
By Admin | Updated: November 16, 2014 22:46 IST2014-11-16T22:46:06+5:302014-11-16T22:46:06+5:30
येथील राममंदिर वार्डात राहणारे शामराव यादवराव गोन्नाडे यांचे वडिलोपार्जित घर असून सिट क्रमांक ३८, प्लॉट क्रमांक ६ मध्ये आहे. त्यांची दोन घरे जुने असून प्लॉट क्रमांक ६ मधून जाण्यायेण्याकरिता सुरेश

न्यायालयाच्या आदेशाला दाखविली केराची टोपली
भंडारा : येथील राममंदिर वार्डात राहणारे शामराव यादवराव गोन्नाडे यांचे वडिलोपार्जित घर असून सिट क्रमांक ३८, प्लॉट क्रमांक ६ मध्ये आहे. त्यांची दोन घरे जुने असून प्लॉट क्रमांक ६ मधून जाण्यायेण्याकरिता सुरेश गोन्नाडे यांना जागा मोकळी करुन दिली आहे. त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली.
न्यायालयाने याबाबतचा निर्णय शामराव गोन्नाडे यांच्या बाजूने दिला. तरी न्यायालयाचा आदेश असूनही नगरपालिकेकडून आमच्या खाजगी जागेतील बांधकाम अतिक्रमणाचे आहे असा नोटीस दिला आहे. याबाबत नगर परिषदेकडून नाहकचा त्रास शामराव गोन्नाडे यांना सहन करावा लागत आहे असे प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. गैरअर्जदार सुरेश गोन्नाडे यांचा भाऊ अशोक रामनाथ गोन्नाडे हे न.प. मध्ये कर्मचारी असून तेथील कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन नोटीस पाठवित आहेत.
त्यांनी अजूनपर्यंत निरीक्षण केल्याचे पत्र दिले नसून न.प. कडून धमकीदायक पत्र देत असल्याचे प्रसिध्दी पत्रकातून म्हटले आहे. यामुळे शामराव गोन्नाडे हे विचलित झाले आहेत.
न्यायालयाचा निर्णय असतांना सुध्दा त्या निर्णयाकडे नगर पालिका दुर्लक्ष करुन डोळेझाक करीत आहे असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)