ंपूर्वजांच्या आठवणी वृक्षरूपाने जपा
By Admin | Updated: June 5, 2015 00:55 IST2015-06-05T00:55:14+5:302015-06-05T00:55:14+5:30
आपल्या पूर्वजांंच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण श्राध्द करतो, मात्र त्यांच्या आठवणी कायमस्वरुपी आपल्यासोबत रहाव्यात म्हणून त्यांच्या नावाने वृक्षलागवड करावी ...

ंपूर्वजांच्या आठवणी वृक्षरूपाने जपा
भंडारा : आपल्या पूर्वजांंच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण श्राध्द करतो, मात्र त्यांच्या आठवणी कायमस्वरुपी आपल्यासोबत रहाव्यात म्हणून त्यांच्या नावाने वृक्षलागवड करावी आणि पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी यांनी येथे केले.
माजी केंद्रीयमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ३ ते ९ जून हा आठवडा पर्यावरण सप्ताह म्हणून राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने मानेगाव (बाजार) येथे आयोजित कार्यक्रमात वंजारी बोलत होत्या. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा परिषद सदस्या ज्योती टेंभुर्णे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जेजूरकर, सरपंच गभणे, अप्पर जिल्हाधिकारी सुनील पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड, तहसीलदार सुशांत बनसोडे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, गट विस्तार अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होत्या.
आपल्या पुढच्या पिढीसाठी संचीत म्हणून आपण पाणी साठवून ठेवण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजना राबवायला सुरुवात केली आहे. गावातील सर्व लोकांनी यामध्ये सहभाग घेवून आपल्या श्रमाचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी यावेळी ज्यांच्याकडे फारसे लक्ष गावातील लोक देत नाहीत ज्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसामान्य लोकही काही करत नाही, अशा गरिबांसाठी पंतप्रधानांनी तीन योजना सुरु केल्यात. त्या योजनांचा लाभ गावातील सर्व लोकांनी घ्यावा, असे आवाहन अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. गावकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापराने शेतीचा खर्च कमी करुन उत्पादनामध्ये वाढ केली तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत निश्चितच बदल होईल. त्याचबरोबर दुबार पीक घेण्यासाठीसुध्दा शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत. शासकीय योजनांचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वंदना वंजारी आमदार अॅड. रामचंद्र अवसरे आणि जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी वृक्षारोपण करुन पर्यावरण सप्ताहाचा शुभारंभ केला. याप्रसंगी विदर्भ- कोकण ग्रामीण विकास बँकेचे व्यवस्थापक यांनी अनेक योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली.
कृषी विभागाने कृषी योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी मंजुषा ठवकर यांनी केले. संचलन विस्तार अधिकारी हुमणे तर आभारप्रदर्शन सरपंच गभणे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)