भाग्यवादी विचार सोडून कर्मवादी विचार ठेवा

By Admin | Updated: January 3, 2015 00:41 IST2015-01-03T00:41:24+5:302015-01-03T00:41:24+5:30

विद्यार्थ्यांनी भाग्यवादी विचार सोडून कर्मवादी विचार ठेवायला हवे, असे प्रतिपादन डॉ. विनोद आसुदानी यांनी केले.

Keep the Feminist thinking away from the thoughtful thinking | भाग्यवादी विचार सोडून कर्मवादी विचार ठेवा

भाग्यवादी विचार सोडून कर्मवादी विचार ठेवा

भंडारा : विद्यार्थ्यांनी भाग्यवादी विचार सोडून कर्मवादी विचार ठेवायला हवे, असे प्रतिपादन डॉ. विनोद आसुदानी यांनी केले. जे.एम.पटेल महाविद्यालय भंडारा येथील वाणिज्य विभाग व वाणिज्य अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्तमानकाळातील विद्यार्थ्याची मानसिकता या विषयावर आयोजित चर्चासत्र ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जे.एम.पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विनोद असुदानी उपस्थित होते. प्रा.डॉ. राहूल मानकर, प्रा. शैलेश वसानी, विद्यार्थी प्रतिनिधी कुमार गौरव आकरे उपस्थित मंचावर होते.
डॉ. असुदानी म्हणाले की, कलात्मक स्वरू पाने काम केले तर ते यशस्वी होते. त्यांनी व्यक्तिला आपला दृष्टिकोन बदलवून जीवनातील ध्येय पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती प्रबळ ठेवून कार्य करायला हवे तरच जीवनाचे सार्थक होईल. वाढत्या जागतिकीकरणामुळे इतर भाषांबरोबर इंग्रजी भाषेचे महत्त्व वाढलेला आहे. तेव्हा इंग्रजी भाषेचा ज्ञान वाढविण्यासाठी रेडियोवरील इंग्रजी बातम्या ऐकणे व इंग्रजी वर्तमानपत्र दररोज वाचन करणे आवश्यक आहे.
प्रास्ताविक प्रा. डॉ. राहुल मानकर यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांच्या विकासाठी घेतलेले मागील कार्यक्रमाचा उल्लेख करू न समोरील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच वाणिज्य विभाग व वाणिज्य अभ्यास मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा यासाठी अनेकविध मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जातात. व त्यातूनच विद्यार्थ्यांच्या कौशल्यात बदल घडवून आणतात.
प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, कोणतेही काम धाडसाने व चिकाटीने केले तर ते यशस्वी होते हे त्यांनी लघुकथेद्वारे सांगितले. संचालन प्रा. विशाखा वाघ यांनी तर कार्यक्रमाचे आभार चांदणी मंगतानी हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाणिज्य विभागातील प्रा. प्रशांत वाल्देव, प्रा.डॉ. आनंद मुळे, प्रा. धनराज घुबडे, प्रा. प्रशांत लिमजे, प्रा. तृप्ती राठोड, प्रा. प्रशांत गायधने, प्रा. नंदिनी मेंढे, प्रा. गुंजन शर्मा तसेच मनोहर पोटफोडे, घनश्याम चकोले आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Keep the Feminist thinking away from the thoughtful thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.