कत्था रंगाचे धानपिक आकर्षणाचे केंद्र

By Admin | Updated: September 18, 2015 00:31 IST2015-09-18T00:31:52+5:302015-09-18T00:31:52+5:30

उत्पादन वाढीकरिता शेतकरी एक ना अनेक सक्कल लढवित असतो. उत्पादनखर्च कमी राहून अधिक उत्पन्न घेण्याच्या मानसिकतेने जुनि कल्पना नव्याने गोंदी (देवरी)....

Katha Painted Attraction Center | कत्था रंगाचे धानपिक आकर्षणाचे केंद्र

कत्था रंगाचे धानपिक आकर्षणाचे केंद्र

देवरी शिवारात प्रयोग : धानशेती सुधारण्याकरिता अभिनव शक्कल
पालांदूर : उत्पादन वाढीकरिता शेतकरी एक ना अनेक सक्कल लढवित असतो. उत्पादनखर्च कमी राहून अधिक उत्पन्न घेण्याच्या मानसिकतेने जुनि कल्पना नव्याने गोंदी (देवरी) शेतशिवारात मारोती गिऱ्हेपुंजे यांनी ४ एकरात अवलंबिली आहे. एक सारखे कथ्था रंगाचे धान परिसरात जगावेगळे असल्याने बघ्याची गर्दी पहायला मिळत आहे.
धानाचे वैशिष्ट्यात मारोती गिऱ्हेपुंजे म्हणाले, या धानाला शेराली हे नाव असून ११५-१२० दिवसात कापणीला येते. या धानावर रोगराई फारच कमी योते. हिरवा रंग किडीला आमंत्रित करतो पण हा धान कथ्था रंगाचा असल्याने आतापर्यंत एकही फवारणी केली नाही.
धानातील खबरा, जमिनीतील तण ओळखायला अडचण नसल्याने मजुरांना त्रास जात नाही. त्यामुळे मजुरी कमी लागून उत्पादनखर्चात बचत होते. पूर्वीच्या काळात अश्या रंगाचे धान लावल्या जायचे त्या धानाला कणउकणली म्हणायचे. परिसरात धान चर्चेचा विषय बनला आहे.
सदर प्रतिनिधीने थेट शेतावर भेट देत निरीक्षणाअंती धान अनोखे असल्याने ये-जा करणारे क्षणभर थांबून पाहून उच्चारतात खरचं धान आकर्षक आहे. श्री पध्दतीने लागवड केल्याने आकर्षकता वाढली आहे. लोंंबीवर धान आल्याने कथ्था, हिरवा रंग मजेदार वाटत आहे. होते. बियाणे गिऱ्हेपुंजे आणि रामटेके यांनी जिल्हयातून आणले आहे. खोडकिडी, करपा रोगाचे कमी प्रमाणात प्रादुर्भाव आढळला.
पुढच्या हंगामाला या वाणाचे हंगाम वाढणार असल्याने शेजारील उद्येभान बहेकार यांनी सांगितले की याचे प्रति ऐकरी उत्पन्न १५ क्विंटल पर्यंत येणार असल्याचे बोलले. (वार्ताहर)

Web Title: Katha Painted Attraction Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.