स्थानिक सल्लागार समितीवर काशिवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:21 IST2018-02-11T23:20:40+5:302018-02-11T23:21:01+5:30
महाराष्ट्र शासनाने राज्याने निसर्ग पर्यटनाबाबत धोरण जाहीर केले आहे.

स्थानिक सल्लागार समितीवर काशिवार
आॅनलाईन लोकमत
साकोली : महाराष्ट्र शासनाने राज्याने निसर्ग पर्यटनाबाबत धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवतालच्या क्षेत्रातील पर्यटन (सोयी-सुविधा) उद्योगांकडून फी आकारून व त्यासंबंधी निर्णय घेऊन त्यापासून मिळणाºया आर्थिक उत्पन्नातून स्थानिक जनतेच्या उपजिविकेचा विकास करण्याची तरतूद आहे.
अशा क्षेत्राकरिता स्थानिक सल्लागार समितीची स्थापना करण्यात येते.
त्याअनुषंगाने नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या स्थानिक सल्लागार समितीची पुनर्ररचना करण्यात आली असून या समितीवर साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश (बाळा) काशिवार यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे राज्य शासनाने घोषित केलेले आहे.