कर्कापूर - सिलेगाव रस्ता चिखलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST2021-02-05T08:38:57+5:302021-02-05T08:38:57+5:30

कर्कापूर - सिलेगाव हा रस्ता पावसाळ्यात चिखलमय होतो, सध्या रस्ता मातीचा आहे. या तीन किमीच्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. ...

Karkapur - Silegaon road is muddy | कर्कापूर - सिलेगाव रस्ता चिखलमय

कर्कापूर - सिलेगाव रस्ता चिखलमय

कर्कापूर - सिलेगाव हा रस्ता पावसाळ्यात चिखलमय होतो, सध्या रस्ता मातीचा आहे. या तीन किमीच्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. तसेच दोन गावांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. शेतीचे कामे करताना निसरड्या रस्त्यावरून शेतकऱ्यांना जावे लागते. वयोवृद्ध शेतकरी या रस्त्यावरून जाऊ शकत नाही. जीव धोक्यात घालून त्यांना तेथून मार्गावरून जावे लागते. गत सात दशकांमध्ये रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. डिसेंबर महिन्यात संबंधित खात्याच्या अभियंत्यांनी रस्ता बांधकामाची हमी दिली होती परंतु अजूनपर्यंत प्रत्यक्ष रस्ता बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे सरपंच प्रल्हाद आगाशे, उपसरपंच शरद आथीलकर, प्रवीण मिश्रा, गणेश सिंदपुरे, महादेव पडोळे, मुकुंद आगाशे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कर्कापूर-सिलेगाव या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर माती व मुरूम काम करण्याकरिता तीस लाखाचा खर्च अपेक्षित आहे. संबंधित खात्याच्या अभियंत्यांनी तसे आश्वासन दिले आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतीची कामे कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार प्रत्यक्ष शेतावरील बांधापर्यंत जाण्याकरीता रस्त्याची तरतूद करण्यात आली आहे सदर रस्ता जुना आहे परंतु या रस्त्याच्या विसर संबंधित बांधकाम विभागाला पडला आहे. कर्कापूर-सिलेगाव या तीन किमीच्या रस्त्याचे बांधकाम मागील सात दशकापासून पडून आहे केवळ तीस लाखाचा खर्च अपेक्षित आहे परंतु येथे निधीची कमतरता असल्याचे सांगण्यात येते. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष रस्ता बांधकामाला सुरुवात न केल्यास शेतकऱ्यांसोबत आंदोलनाचा इशारा तुमसरचे माजी पंचायत पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.

Web Title: Karkapur - Silegaon road is muddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.