भंडारा : शहापूर येथील डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनिअर कॉलेजमध्ये २२ वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन तुरस्कर, जॉय ऑफ दी गिव्हिंगचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन दुरूगकर, शहापूरचे सरपंच मोरेश्वर गजभिये, सचिव महंतो, डीएसएचे प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर, माजी सैनिक सुभेदार मेजर अंकुश कटरे, प्रा. वंदना लुटे, प्रा. युवराज टेंभरे व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते. डॉ. नितीन तुरस्कर व नितीन दुरूगकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित अतिथींनी भारत-पाक कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्यगाथेला उजाळा दिला. आज आपण सर्व सैनिकांच्या पराक्रमामुळेच देशात सर्व सुरक्षित आहोत. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने कारगिल युद्धाचे वर्णन करून सांगितले. डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनिअर कॉलेज, शहापूरचे विद्यार्थी, शिक्षक आदी उपस्थित होते. संचालन प्रा. वंदना लुटे यांनी, उपस्थितांचे आभार प्राचार्य नरेंद्र पालांदूरकर यांनी मानले.
शहापूर येथे कारगिल विजय दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:36 IST