शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ जुलैला मतदान आणि निकाल लागणार
2
शिवसेना खासदार रवींद्र वायकर 'शिवतीर्थ'वर; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
3
"मी तर वारकऱ्यांमध्ये गेलो होतो पण..."; कार्यकर्त्याने पाय धुतल्यावर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण
4
लोकसभेनंतर विधानसभेतही अजित पवारांना धोबीपछाड?; शरद पवारांकडून बारामतीत मोर्चेबांधणी
5
VIDEO: "हा काय भारत नाही"; चाहत्याला मारण्यासाठी धावला हारिस रौफ; रस्त्यातच मोठा गोंधळ
6
जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
7
इंडिया आघाडीची TDP ला ऑफर, तरीही भाजपाला चिंता नाही; लोकसभेचा असा आहे नंबर'गेम'
8
₹१८ वर जाऊ शकतो हा शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "कर्ज कमी करणार कंपनी, खरेदी करा..."
9
प्रियंका गांधी - स्मृती इराणी यांच्यात होणार लढत? भाजप १९९९ च्या इतिहासाची करणार पुनरावृत्ती?
10
९०% लोकांना माहीत नाही दही खाण्याची योग्य पद्धत; करतात 'या' चुका, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला
11
"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
12
सामान्य माणसाचं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, अक्षय कुमारच्या 'सरफिरा'चा रोमांचक ट्रेलर रिलीज
13
Team India सुपर-८ साठी सज्ज; रोहितने सांगितली रणनीती, म्हणाला, "शक्य तितक्या..."
14
Gautam Gambhir Interview: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरची मुलाखत; निवड जवळपास निश्चित, अधिकृत घोषणेची प्रतिक्षा
15
"माझ्यासोबत असं का केलं"; वसईत एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या
16
₹४००० पार जाऊ शकतो 'हा' शेअर; JK Cement सह 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून मराठा समाजाची फसवणूक, शिंदेसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा आरोप
18
गायिका अलका याग्निक यांना झालाय दुर्मिळ आजार, पोस्ट करुन केला खुलासा
19
सांगलीचा वाघ पाकिस्तानशी भिडला, ९ गोळ्या झेलूनही नाही हरला; कोण आहे रिअल चंदू चॅम्पियन?
20
Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!

काेराेना परतीचा मार्गावर; लांब पल्यांच्या रेल्वेगाडीत वाढली वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 5:00 AM

भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे अजूनही अनेक प्रवाशी रेल्वेला पसंती देतात. काेराेना संघर्ष काळात रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर अनलाॅक प्रक्रियेनंतर गाड्या सुरु झाल्या. भंडारा- वरठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रेलचेलही माेठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु सुपरफास्ट रेल्वे गाड्याच्या संख्येने पॅसेंजर रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे लाेकल गाडी सुरु झाली तर सुपरफास्ट रेल्वेवरील ताण कमी हाेईल. असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : काेराेनाची तिसरी लाट परतीच्या मार्गावर असून नागरी वाहतूकीमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषत: रेल्वेगाड्या हाऊसफूल जात असून लांब पल्ल्यांच्या प्रवासासाठी वेटींग दिसून येत आहे. आतापासूनच प्रवाशांनी दाेन महिन्यांनंतरच्या तिकीटांची बुकींग केल्याचे वास्तव आहे.भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे अजूनही अनेक प्रवाशी रेल्वेला पसंती देतात. काेराेना संघर्ष काळात रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर अनलाॅक प्रक्रियेनंतर गाड्या सुरु झाल्या. भंडारा- वरठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रेलचेलही माेठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु सुपरफास्ट रेल्वे गाड्याच्या संख्येने पॅसेंजर रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे लाेकल गाडी सुरु झाली तर सुपरफास्ट रेल्वेवरील ताण कमी हाेईल. असे प्रवाशांचे म्हणणे आहे. काही गाड्यांमध्ये काेराेना नियमांची पायमल्ली हाेत असल्याचेही दिसून येत आहे. मात्र काेराेना परतीच्या मार्गावर असल्याने तुर्तासतरी या बाबीकडे सर्वच कानाडाेळा करीत असल्याचे समजते.

या तीन मार्गांवर वेटिंग....

गाेंदिया-मुंबई :भंडारा राेड रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या गाेंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेसमध्ये वेटिंग दिसून येत आहे. सणासुदीच्या काळात ही वेटिंग वाढत असते.आझाद हिंद :लांब पल्ल्याच्या या रेल्वे गाडीतही आरक्षीत प्रवाशांची संख्या अधिक आहे. प्रवाश्यांनी आतापासूनच या गाडीसाठी तिकीट बुकिंग केले आहे.

मुंबई एक्सप्रेस :मुंबईकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन या दाेन्ही रेल्वेत आतापासूनच तिकीटासाठी वेटिंग दिसून येत आहे. विदर्भाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे.

मार्चमध्ये बंद झाल्या होत्या रेल्वे - काेराेना महामारीचा प्रकाेप सुरु हाेताच रेल्वे प्रशासनाने सेवा बंद केली हाेती. त्यानंतर पहिली लाट ओसरल्यापर्यंत ही सेवा बंद हाेती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सुरु करण्यात आली. त्यातही लाेकल आताही बंद आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटातून रोज लाखाची कमाई काेराेना संघर्ष काळात रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्म तिकिटांचे दर चांगलेच वाढविले हाेते. ५० रुपयापर्यंत हे दर पाेहाेचले हाेते. आता प्लॅटफाॅर्म तिकिट दहा रुपयांना मिळत असले तरी महागड्या तिकिट विक्रीतून रेल्वेला लाखाे रुपयांची कमाई झाली हे विशेष.

 

टॅग्स :railwayरेल्वे