करडी पोलीस ठाण्याला मंजुरी
By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:55+5:302014-05-11T00:04:55+5:30
सन १९७० च्या दशकापासून प्रलंबित असलेल्या करडी पोलीस ठाण्याच्या मंजुरीची फाईल अखेर पुढे सरकली आणि चौकीचे जागी ठाणे मंजुरी मिळाली.

करडी पोलीस ठाण्याला मंजुरी
करडी (पालोरा) : सन १९७० च्या दशकापासून प्रलंबित असलेल्या करडी पोलीस ठाण्याच्या मंजुरीची फाईल अखेर पुढे सरकली आणि चौकीचे जागी ठाणे मंजुरी मिळाली. पुढील महिन्यात पोलीस ठाण्यासाठी कर्मचार्यांची बदली प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता वर्तविली असून ठाण्याच्या मंजुरीमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार आहे. करडी पोलीस ठाण्याची मागणी जुनी आहे. सन १९७० च्या दशकात मागणीचा जोर होता. अनेक अडथळ्यांमुळे फाईल जैसे थे पडून होती. सध्या पोलीस चौकीमध्ये कर्मचार्यांचा अभाव आहे. ४५ हजार लोकसंख्येच्या संरक्षणाची जबाबदारी तीन पोलीस सांभाळत आहेत. एक साहायक फौजदार, दोन-तीन कर्मचार्यांवर २८ गावांची धुरा आहे. सामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे करडी पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस ठाण्यामध्ये करण्याची मागणी वारंवार सुरु होती. गुन्ह्याचे प्रमाण कमी असल्याचे कारणावरून पोलीस ठाण्याची फाईल पुढे सरकत नव्हती. त्यातच विविध पक्ष व संघटनांनी, नागरिकांनी रेटा वाढविल्याने आ. अनिल बावनकर यांनी पुढाकार घेतल्यामुळे पोलीस ठाण्याची मागणी मंजूर झाली. (वार्ताहर)