धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
By Admin | Updated: July 6, 2014 23:47 IST2014-07-06T23:47:28+5:302014-07-06T23:47:28+5:30
स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद निवडीला स्थगिती दिल्यानंतरही अध्यक्ष म्हणून दे.ग. चेटुले यांच्या नावाचा उल्लेख करून धर्मदाय आयुक्ताच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत

धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
लाखनी : स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद निवडीला स्थगिती दिल्यानंतरही अध्यक्ष म्हणून दे.ग. चेटुले यांच्या नावाचा उल्लेख करून धर्मदाय आयुक्ताच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचा आरोप उपाध्यक्ष मु.के. भांडारकर यांनी केला आहे.
राष्ट्रीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालयात दि. ७ जुलै रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रम पत्रिकेत दे.ग. चेटुले यांचे नाव प्रसिद्ध केले आहे. मुख्याध्यापिका सुनंदा देशपांडे यांनी हेतुपुरस्सर नाव प्रसिद्ध केले आहे. धर्मदाय आयुक्तांचे आदेश सर्व शाळांना पाठविले आहेत. पुढील कारवाईपर्यंत अध्यक्षांचे अधिकार उपाध्यक्षांना दिले आहे. असे असताना संस्था सदस्य दे.ग. चेटुले अध्ृयक्ष म्हणून स्वत:ला मिरवत असतात. त्याला काही सदस्य पाठबळ देत असल्याचा आरोप भांडारकर यांनी केला आहे.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेची स्थापना १९४१ मध्ये झाली. संस्थेची ११ शाळा, महाविद्यालये, ग्रंथालय व वसतीगृहे आहेत. स्व.बापूसाहेब लाखनीकरांनी निस्वार्थ भावनेतून संस्थेची स्थापना केली.
उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून १९४१ मध्ये समर्थ विद्यालयाची स्थापना केली. संस्थेच्या सालेभाटा, पालांदूर, कनेरी (दगडी), चिचगड येथे शाळा आहेत. अध्यक्षपदाची निवड नियमानुसार झाली नसल्यामुळे संस्था सदस्य मोहन भांडारकर व इतरांनी निवडीला धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. त्यानुसार अध्यक्षांचा कार्यभार उपाध्यक्षांकडे सोपविला आहे.
संस्थेने अध्यक्षपद निवडीची प्रक्रिया राबविताना नोंदविलेल्या आक्षेपावर धर्मदाय आयुक्ताकडे सक्षमरित्या चेटुले यांची बाजू मांडली नसल्याची उलटसुलट चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)