‘जरा याद करो कुर्बानी’ पंधरवडा
By Admin | Updated: August 9, 2016 00:33 IST2016-08-09T00:33:15+5:302016-08-09T00:33:15+5:30
केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सुचनेनुसार भारत देश हा स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० व्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे ....

‘जरा याद करो कुर्बानी’ पंधरवडा
सर्व शाळांमध्ये साजरा होणार : मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सूचना
अशोक पारधी पवनी
केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सुचनेनुसार भारत देश हा स्वातंत्र्य प्राप्तीच्या ७० व्या वर्षात पदार्पण करीत असल्यामुळे राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये आझादी ७० याद करो कुर्बाणी हा पंधरवाडा ९ ते २३ आॅगस्टदरम्यान साजरा करण्याचे शासन आदेश धडकले आहेत.
शासनाने दिलेल्या आदेशान्वये ९ पैकी एक उपक्रम प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांनी साजरा करावा तर उच्च माध्यमिक शाळांनी दोन उपक्रम साजरे करावयाचे ओहत. उपक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी जवानांसाठी शुभेच्छा कार्ड तयार करावीत आणि जवळच्या एपीओ सेंटरवर ती पाठवावीत, विद्यार्थ्यांनी सामुहिक वृक्षारोपण मोहिम राबवावी. शाळांनी १८५७ च्या स्वातंत्र्य चळवळी विषयी माहिती देऊ शकणाऱ्या तसेच स्वातंत्र्याच्या लढ्याविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करावे. यामध्ये लेखक, सेना दलातील जवान, निवृत्त व कार्यरत असावेत यामध्ये राज्यातील हुतात्म्यावर विशेष भर असावा. चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन स्पर्ध, स्वातंत्र चळवळ व थीम ठेवून खेळाचे आयोजन करणे, धावण्याच्या स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, देशभक्ती गीत गायन स्पर्धा ह्यांचा समावेश करावा. २३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व मंडळाशी संलग्नीत शाळामधील विद्यार्थ्यांनी (खाजगी अनुदानित/ विनाअनुदानीत शाळांसह) राष्ट्रगीताचे समूहगान करावयाचे आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये पंधरवाडा साजरा करण्यात येईल याची दक्षता आयुक्त शिक्षण यांनी घ्यावी त्यांना कार्यक्रमाचे समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे.