धान चोरट्यांची टोळी मुद्देमालासह जेरबंद
By Admin | Updated: April 13, 2015 01:43 IST2015-04-13T01:43:29+5:302015-04-13T01:43:29+5:30
तुमसर, आंधळगाव तथा सिहोरा परिसरात शेतातील धान चोरणाऱ्या टोळीला तुमसर पोलिसांनी जेरबंद केले. या

धान चोरट्यांची टोळी मुद्देमालासह जेरबंद
तुमसर पोलिसांची कारवाई : पाच लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त
तुमसर : तुमसर, आंधळगाव तथा सिहोरा परिसरात शेतातील धान चोरणाऱ्या टोळीला तुमसर पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीकडून तुमसर पोलिसांनी ४ लक्ष ८७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात एका वाहनाचाही समावेश आहे.
प्रदीप मोडकू लांजे (२५), सयसराम भोला नागपुरे (२४), महेंद्र धनिराम सोयाम (२२) तिन्ही रा.सोंड्या अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तुमसर पोलिस ठाणे अंतर्गत सतीश अमृत पटले रा. मेहगाव यांच्य शेतशिवारातून २८ पोते ‘जय श्रीराम’ धान (वजन २० क्विंटल) चोरीला गेले होते. चोरट्यांकडून केवळ १० हजार नगदी मिळाले. चोरी गेलेल्या धानाची किंमत ४४ हजार रूपये होती.
सुनील दामोधर मेहर रा.तुमसर यांचे शेत पिपरा येथे आहे. यांच्या शेतातून ३२ पोते जय श्रीराम जातीचे धान (किंमत ४० हजार) नगदी १२ हजाराचा मुद्देमाल व वाहन क्रमांक एम.एच. ३६ एफ २८४१ किंमत ४ लक्ष असे एकूण ४ लक्ष १२ हजार हस्तगत करण्यात आला.
सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत हरिद्वार मारोती पटले रा.मोहाडी खापा यांच्या शेतातून २१ पोते जय श्रीराम जातीचे धान किंमत ३० हजार, १४ पोते जय श्रीराम तांदूळ किंमत २३ हजार १०० हस्तगत केला. सुभाष हिबाजी निशाने रा.रेंगेपार यांच्या शेतशिवारातून ३१ पोते खजाना जातीचे धान व दोन दोरखंड किंमत ४० हजार, नगदी १४ हजार हस्तगत करण्यात आला.
सहेसलाल लक्ष्मण राहांगडाले रा.गोंडीटोला यांच्या शेतशिवारातून २७ पोते केसर जातीचे धान किंमत ४७ हजार २५० रुपये ९ हजार हस्तगत केले. भूषणलाल कुंजीलाल ठाकरे रा.सालई खु. यांचे शेतशिवारातून ४५ पोते धान जय श्रीराम किंमत ६७ हजार ५००, १९ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला. धान चोरटे हे दिवसभर शेतशिवाराची पाहणी करून रात्री चारचाकी वाहन घेऊन धानाची चोरी करायचे. चोरी केलेले धान पाथरी येथील सहकारी राईस मिलमध्ये पहाटे भरडाईसाठी न्यायचे. सकाळी बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये विक्री करण्याचा गोरखधंदा करीत होते. गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक किशोर गवई, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश हावरे, पोलीस हवालदार धर्मेंद्र बोरकर, मौजीभाई सहारे, जयसिंग लिल्हारे, गिरीश पडोळे, सतीश ढेंगे, स्नेहल गजभिये, कैलाश पटोले ढबाले यांनी कारवाई केली. (तालुका प्रतिनिधी)