शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

‘कॅशलेस’च्या नावावर दूध उत्पादकांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 00:58 IST

जिल्ह्यातील दुध उत्पादक व शेतकऱ्यांचा कणा असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक असून या बँकेला पाहिजे तसा पैसा पुरविला जात नाही.

सुनिल फुंडे यांचा आरोप : भंडाऱ्यात दुग्ध उत्पादकांचा मेळावा भंडारा : जिल्ह्यातील दुध उत्पादक व शेतकऱ्यांचा कणा असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक असून या बँकेला पाहिजे तसा पैसा पुरविला जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व दुध उत्पादक त्रस्त झाले असून ‘कॅशलेस’च्या नावावर जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांची थट्टा चालवित असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी केला. सहनिबंधक सहकारी संस्थेच्या निर्देशानुसार जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाने ३० डिसेंबर रोजी कॅशलेस व्यवहार यावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुनिल फुंडे होते. अतिथी म्हणून विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थेचे एम.एम. देशकर, स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक रंजित दास, जे.पार्थसारथी, हरीहर शान, नाबार्डचे व्यवस्थापक अरविंद खापर्डे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक संजय बरडे, सहायक निबंधक प्रदिप भानारकर, दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी प्रदिप पाथरे व दुध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. यावेळी फुंडे म्हणाले, जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक व शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असून ज्या बँकेच्या भरोशावर जिल्ह्यातील दुध उत्पादक व शेतकरी ताठ मानेने जगत आहेत. त्याच शेतकऱ्यांना केंद्र शासनाने व राज्य शासनाने अडचणीत आणले. नोटाबंदीच्या नावाखाली सर्वत्र कॅशलेसचा व्यवहार सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना पुरेसा पैसा पुरविण्यासाठी जिल्हा बँकेला पैसा मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्याला दररोज कामानिमित्त पैसा लागत असतो. त्याच्या खात्यात पैसा असतानादेखील पुर्ण पैशाचा सदुपयोग करता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले. तर दुसरीकडे कॅशलेसचा धिंदोळा पिटणे हा कुठला न्याय, शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहार कसा समजणार असा प्रश्न करून त्यांच्या हक्काचा पैसा मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. प्रास्ताविक करण रामटेके यांनी तर आभार अध्यक्ष रामलाल चौधरी यांनी मानले.(जिल्हा प्रतिनिधी)