जांबमध्ये अवतरला गाडगेबाबांचा अनुयायी
By Admin | Updated: July 29, 2016 00:32 IST2016-07-29T00:32:53+5:302016-07-29T00:32:53+5:30
संत गाडगे महाराज यांचे कार्य निरंतर चालू ठेवण्याकरिता कुटुंबाची पर्वा न करता मिळेल ते खावून स्वेच्छा, सफाई ...

जांबमध्ये अवतरला गाडगेबाबांचा अनुयायी
७३ हजार गावांमध्ये केली स्वच्छता : भारतभ्रमण करून सफाई व कीर्तन करतात
रमेश लेदे जांब (लोहारा)
संत गाडगे महाराज यांचे कार्य निरंतर चालू ठेवण्याकरिता कुटुंबाची पर्वा न करता मिळेल ते खावून स्वेच्छा, सफाई व समाज जागविण्याचे कार्य संत गाडगे महाराज यांचे शिष्य विठ्ठल महादेव पाटील रा.जमनापूर जि.बिदर (कर्नाटक) हे करीत आहेत.
सन १९४७ पासून आपण विविध राज्यातील गावांमध्ये जावून त्या गावातील नाली, रस्ते, सफाईचे कार्य करून सायंकाळी समाजप्रबोधन (कीर्तन) करीत असल्याची माहिती दिली.
भारत दौरा करून विविध राज्यातील ७२ हजार ९९० गावातील नाली, रस्ते, सफाई काम केल्याची माहिती दिली.
रस्त्यांनी फिरून जेवण मागत नाही. ज्यांनी आणून दिले तेच खावून आपला पोट भरत असतात. अनेक गावामध्ये अनेक दिवस उपाशी राहून सफाई व किर्तनाचे कार्य केल्याची माहिती दिली.
आज ते ७० ते ७५ वर्षाचे असले तरी निरंतर गावागावात जावून सफाई, स्वच्छ व किर्तनाचे कार्य विनामुल्य करीत आहेत. त्यांच्याकडे आजही अनेक ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र पहावयास मिळते.
तो प्रत्येक गावात ७ ते ८ दिवस राहून स्वच्छतेचे कार्य करून पुढचे गाव गाठत असतात. ते यापूर्वी कांद्रीत होते. आज जांब मध्ये नाली साफ, स्वच्छता व किर्तनाचे कार्य करीत आहेत. यांनी या कार्याकरिता शासनाची कोणत्याच योजनेचा फायदा घेतला नसल्याचे सांगण्यात येते.