वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उड्डाण पुलाला धडकली

By Admin | Updated: April 26, 2017 00:29 IST2017-04-26T00:29:05+5:302017-04-26T00:29:05+5:30

नागपूरहून ठाणा पेट्रोलपंपकडे लग्नाची वरात घेऊन येणारी ट्रॅव्हल ठाणा पेट्रोलपंप टी-पार्इंट उड्डाण पुलाला आदळली. यात वाहन चालक जखमी झाला.

The journey of the tourists took place | वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उड्डाण पुलाला धडकली

वऱ्हाड्यांची ट्रॅव्हल्स उड्डाण पुलाला धडकली

वाहनचालक जखमी : ५५ ते ६० वऱ्हाडी बचावले
जवाहरनगर : नागपूरहून ठाणा पेट्रोलपंपकडे लग्नाची वरात घेऊन येणारी ट्रॅव्हल ठाणा पेट्रोलपंप टी-पार्इंट उड्डाण पुलाला आदळली. यात वाहन चालक जखमी झाला. मात्र यातील सुमारे ५५ ते ६० वऱ्हाडी सुखरूप बचावले. ही घटना सोमवारला रात्री ठाणा येथे घडली.
ठाणा पेट्रोलपंप येथील यशोराज रामटेके यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी वधुपक्षाकडील मंडळी ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ३१/डी एस ३९६९ ने ६० वऱ्हाड्यासमवेत सायंकाळी जवाहरनगरला येत होते. सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वाहन चालकांचे संतुलन बिघडल्याने वाहन डोलायला लागले. चालकाने प्रथम उजव्या बाजुला असलेल्या नालीला धडक दिली. थोडा दूर जाऊन डाव्या बाजुला असलेल्या उडाण पुलाच्या भिंतीला वाहन आदळले. रस्त्यावरील दुचाकी, प्रवासी, बस यांना वाचवित शेवटी ठाणा टीपार्इंटजवळील उड्डाण पुलाच्या खालील पिल्लरला जाऊन आदळली आणि गाडी तिथेच बंद पडली. त्यानंतर वऱ्हाड्यांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. वाहन चालकाच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला.
ठाणा येथील तरूणांनी वाहनचालकाला बाहेर काढले. घटनेची माहिती होताण राष्ट्रीय महामार्ग पथक व जवाहरनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला प्रथम जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: The journey of the tourists took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.