जेसीसच्या स्कूल बसला अपघात
By Admin | Updated: July 15, 2015 00:36 IST2015-07-15T00:36:47+5:302015-07-15T00:36:47+5:30
मुलांना घेण्याकरिता शाळेची बस आमगाववरुन शिंगोरी चांदोरी जात असताना शिंगोरी नाल्याजवळ ट्रकला ओव्हरटेक ...

जेसीसच्या स्कूल बसला अपघात
शाळेचा हलगर्जीपणा : बसमध्ये महिला कर्मचारी नाही
भंडारा : मुलांना घेण्याकरिता शाळेची बस आमगाववरुन शिंगोरी चांदोरी जात असताना शिंगोरी नाल्याजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कुल बस क्रमांक एम एच ३६, एफ४०१ शेतात शिरली. या गाडीमध्ये १५ मुले होती. बसमध्ये धारगाव व आमगाव परिसरातील मुले होती. सुदैवाने कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
अपघाताची माहिती भ्रमणध्वनीद्वारे गावातील काही नागरिकांनी दिली असता संपूर्ण पालक या ठिकाणी हजर झालेत. शाळेकडून मात्र कसलीही मदत किंवा दवाखान्यात जाण्याकरिता पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. नागरिकांच्या माहितीनुसार ही स्कुल बस ५० ते ६० किमीच्या गतीने दररोज जाते. याद्वारे असे कळते की, शाळेकडून हलगर्जीपणा दिसून येतो. (प्रतिनिधी)