रात्रीला जेसीबीने रेतीचे खणन

By Admin | Updated: October 6, 2014 23:07 IST2014-10-06T23:07:52+5:302014-10-06T23:07:52+5:30

निवडणूक असल्याने महसूल विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. ही संधीसाधुन रेती चोरट्यांनी तामसवाडी नदीतून जेसीबीद्वारे रात्रीला रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येत आहे.

JCB sand mining at night | रात्रीला जेसीबीने रेतीचे खणन

रात्रीला जेसीबीने रेतीचे खणन

अधिकारी निवडणुकीत व्यस्त : लाखोंचा महसूल बुडाला
तुमसर : निवडणूक असल्याने महसूल विभागाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. ही संधीसाधुन रेती चोरट्यांनी तामसवाडी नदीतून जेसीबीद्वारे रात्रीला रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येत आहे.
लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांची रेती उपसा करण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे कायदेशीर रेतीचे उत्खनन बंद झाले. परंतु रेती चोरट्यांची चोरीची क्षमता वाढली आहे. तामसवाडी येथील नदी पात्रातून ट्रॅक्टरद्वारे रेती चोरून एकत्र साठा केल्या जात आहे व पहाटे पहाटे जेसीबीद्वारे भरल्या जाणाचा खोरखधंदा पुर्वीपासूनच सुरू आहे. परंतु काही दिवसापासून सर्व अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याकारणाने रेती चोरणाऱ्यांची दिवाळी सुरू झाली आहे. महसूल विभागाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने रेती तस्करांची हिम्मत वाढली आहे.
मशिनीद्वारे दररोज १० ट्रक रेती भरून मशीन परत येते हा कार्यक्रम सहा सात दिवसांपासून सुरू झाला आहे. यात अनेक ट्रक मालक सामील आहेत. तालुक्यात ८ ते १० व्यक्ती यांनी समूह तयार केला आहे. आणि ही चोरी समुहात ठरतात. ज्यामुळे देणे घेणेही समुहातच होते. अनेक रेती चोरट्यांनी स्वत:चे ट्रक उभे केले.
काहींनी जेसीबी घेतली. त्यामुळे यांना रेतीचा चोरटा व्यवसाय करण्यास सोपे जात आहे. मागे तहसीलदार यादव यांनी पोलिसांचे सहकार्य घेवून पोलीस चौकी बसविली होती. परंतु त्यांच्यावरही राजकीय दबाव आल्यामुळे ती चौकी बंद झाल्यात जमा असल्याचे बोलले जात आहे.
मागील काळात महसूल विभागाने यांच्यावर कारवाई केली तेव्हा अनेक पुढाऱ्यांनी फोन करून कारवाई शिथील करण्याची विनंती केल्याने कारवाईचा केवळ फार्स ओढला होता. रेती तस्करांवर कारवाई न झाल्याने त्यांची हिंमत वाढली असल्याने त्यांनी जेसीबीच्या माध्यमातून रेतीचे खणन करण्यात येत आहे. यामुळे प्रशासनावरही अविश्वासाची नजर जाते. परंतु सध्या पुर्ण अधिकारी सकाळपासून रात्रीपर्यंत निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. याचाच लाभ घेत रात्रीच्या अंधारात रेतीचे खणन करण्यात येत आहे. यामुळे महसूल विभागाचे लाखोंचे नुकसान होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: JCB sand mining at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.