गिरोला येथे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2016 00:37 IST2016-09-15T00:37:35+5:302016-09-15T00:37:35+5:30
पोलीस ठाणे साकोली अंतर्गत मौजा गिरोला / जांभळी येथे घडलेल्या अंधश्रद्धेच्या घटनेच्या संबंधाने सदर गावातील ..

गिरोला येथे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती
मान्यवरांचे मार्गदर्शन : जादूटोणा विरोधी कायद्याचे दिले धडे
साकोली : पोलीस ठाणे साकोली अंतर्गत मौजा गिरोला / जांभळी येथे घडलेल्या अंधश्रद्धेच्या घटनेच्या संबंधाने सदर गावातील लोकांना अंधश्रद्धेबाबत जनजागृती करण्याचे दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे साकोली व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडाराच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
गिरोला येथील हनुमान मंदिराजवळील पटांगणावर आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष विष्णूदास लोणारे, प्रशांत रामटेके भंडारा, अश्विनी भिवगडे रा.लाखनी, हर्षल मेश्राम भंडारा, कन्हैया नागपूर, साकोली तालुका प्रभारी लखन मल्लानी यांनी विविध प्रयोग करून जादोटोणा व अंधश्रद्धेबाबत माहिती देवून जनजागृती करून अंधश्रद्धा निर्मूलन व जादुटोणा विरोधी कायदा २०१३ संबंधात माहिती देण्यात आली.
कार्यक्रमामध्ये गिरोला येथील सरपंच मनिषा नागलवाडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अरविंद शालीकराम मेश्राम तसेच गावातील ३०० ते २५० महिला पुरुष उपस्थित होते.
अंधश्रद्धेसंबंधात सदर कार्यक्रमामध्ये लोकांनी उपस्थित प्रश्नांची शास्त्रीय कारणे सांगून लोकांना मार्गदर्शन करून शंकांचे निराकरण करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता सहायक पोलीस निरीक्षक वर्मा, हवालदार ग्यानीराम गोबाडे, फुलचंद सिंदीमेश्राम व कर्मचाऱ्यांनी यांनी विशेष प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)