पवनारा नाल्यातून काढली जलपर्णी वनस्पती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:26+5:302021-03-26T04:35:26+5:30
२५ लोक ०१ के पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा नाल्यावर जलपर्णीचे आच्छादन पाहून नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नितेश धनविजय यांच्यासह ...

पवनारा नाल्यातून काढली जलपर्णी वनस्पती
२५ लोक ०१ के
पवनारा : तुमसर तालुक्यातील पवनारा नाल्यावर जलपर्णीचे आच्छादन पाहून नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नितेश धनविजय यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी बुधवारी बरीच वनस्पती काढून फेकली.
जलपर्णीत ‘वॉटर हायसिंथ’ या नावाने ओळखली जाणारी पाणवनस्पती आहे. पाण्यावर तरंगणारी, लांब देठ, जाड हिरवी पाने व जांभळ्या रंगाची फुले असलेली ही वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील असून, तिचे शास्त्रीय नाव ‘इकॉर्निया क्रासिप्स’ आहे.
माणसाबरोबर ती आता बऱ्याच भागात पसरली आहे. पाण्यावरील तिच्या घट्ट थरामुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो व डासासारख्या कीटकांच्या पैदाशीसाठी जलपर्णीची जागा पोषक ठरते. येथील दूषित पाणी पिल्याने वन्यप्राण्यांसह पाळीव प्राणी व मनुष्याच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकते. या जलपर्णी वनस्पतीचे बऱ्याच दिवसांपासून पवनारा नाल्यावर आच्छादन पाहून नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नितेश धनविजय, साहाय्यक शंखपाल तिबुडे, प्रकाश साखरे, प्रदीप गोलीवार, बेले वनरक्षक आर.डब्लू. राऊत, टी.एच. घुले, आर.एस. वाघाडे, सी.एन. गाढवे, वाय.टी. रहांगडाले, एस.एच. भोंगाडे, ए.डी. बिसेन, बी.व्ही. गेडाम, रूपाली राऊत, जे.एन. राऊत, भाग्यश्री नागरिकर, एल.एम. लाडेकर, ए.सी. हटकर, वनमजूर देवानंद मरस्कोले, बुधराज गौरे, अनमोल नेवारे, मुन्ना उईके, कैलाश मेश्राम, गणेश गौपाले आदी वनकर्मचाऱ्यांनी बरीच जलपर्णी वनस्पती बुधवारी नाल्याबाहेर काढली.
जलपर्णी वनस्पतीमुळे होणारे नुकसान तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडाचे महत्त्व वनपरिक्षेत्राधिकारी नितेश धनविजय यांनी उपस्थितांना पटवून दिले; तसेच जलपर्णीला समूळ नष्ट करू व प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करू, असेही सांगण्यात आले. सरपंच रशीद शेख यांनी वनकर्मचाऱ्यांच्या या उपयुक्त कामगिरीबद्दल त्यांना धन्यवाद देत आभार मानले.