अंगणवाडी कर्मचाºयांचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 22:33 IST2017-10-05T22:33:13+5:302017-10-05T22:33:26+5:30
राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या राज्यव्यापी बेमुदत संपाच्या आवाहनानुसार ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत.

अंगणवाडी कर्मचाºयांचे जेलभरो
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या राज्यव्यापी बेमुदत संपाच्या आवाहनानुसार ११ सप्टेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह जेलभरो आंदोलन करण्यात आला.या आंदोलनात शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी कर्मचाºयांना पोलिसांनी जिल्हा कचेरी समोरून अटक करून पोलीस मुख्यालयात घेऊन गेले. सायंकाळी उशिरा यासर्वांची जामीनावर सुटका करण्यात आली.
राज्यातील अंगणवाडी कर्मचारी मानधनवाढ, पोषण आहार रकमेत वाढ, बालके व गरोदर महिलांच्या देखभालीसाठी असलेल्या शासकीय योजनांची परिणामकारकता वाढविण्यात यावी व इतर मागण्यांसाठी या कर्मचाºयांनी संप पुकारले आहे.
अंगणवाडी कर्मचाºयांच्या बेमुदत संपाचा आज २६ दिवस होऊनही राज्य सरकार संप संपविण्याऐवजी संप फोडण्याचा आणि चिघळविण्याचा प्रयत्न करीत आहे.
संपकरी अंगणवाडी कर्मचाºयांची एकजुट भक्कम असून सन्मानजनक तोडगा निघाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही कृती समितीने स्पष्ट केले आहे.
या अनुषंगाने गुरूवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष सविता लुटे, जि. कार्याध्यक्ष हिवराज उके व एचएमएसच्या अध्यक्ष किसनाबाई भानारकर यांच्या नेतृत्वात मंडळ जेलभरो आंदोलनात सहभागी झाले.
यात प्रामुख्याने दिलीप उडाणे, सिवता लुटे, हिवराज उके, किसनाबाई भानारकर, मंगला गजभिये, त्रिवेणी माकडे, अल्का बोरकर, रिता लोखंडे, शोभा बोरकर, मंगला रंगारी, गौतमी मंडपे, पुष्पा हुमणे, सुनंदा चौधरी, लहाना राजूरकर, कविता, सुषमा जांभुळकर, शमीमबानो खान, छाया क्षीरसागर, ललीता खंडाईत, वंदना बघेले, अनिता घोडीचोरे, छाया गजभिये, आशा रंगारी, उषा रंदिवे, विजया काळे, विद्या गणवीर इत्यादींचा समावेश होता.