शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा येथील येथील जागृत भृशुंड गणेश देवस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:53 IST

विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे.

ठळक मुद्देविदर्भातील अष्टविनायक : श्रीगणेशाची आठ फुट उंच आकर्षक मूर्ती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील अष्टविनायकात स्थान असलेल्या येथील भृशुंड गणेश जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवानिमित्त याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.वैनगंगा नदीच्या शहरावर वसलेल्या भंडारा शहरात मेंढा परिसरात भृशुंड गणेश मंदिर आहे. हेमाडपंती पद्धतीचे बांधलेल्या या मंदिरात श्रीगणेशाची आठ फुट उंच आणि चार फुट घेराव असलेली सुंदर व आकर्षक मूर्ती आहे. इतिहासाच्या नोंदीनुसार येथे श्री चक्रधर स्वामींनी भेट दिली. स्वामींची भेट व मूर्ती स्थापनेचा काळ जवळजवळ एकच असल्याचे जाणवते. त्यावरून ही मूर्ती ११३० मध्ये स्थापन झालेली असावी. गणेशमूर्तीसमोरील शिवलिंग व नंदीची स्थापना महंत अलोनीबाबा यांनी केली आहे. मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर सर्व दु:खाचा ºहास होतो अशी भाविकात मान्यता आहे. पवित्र श्रद्धा आणि शुद्ध मनाचे माहेरघर असल्याचे गाभाऱ्यात प्रवेश घेतल्यावर प्रचिती येथे. मूर्तीच्या उजव्या बाजूला हेमाडपंती शैलीतील एक दगडी शिवलिंग, शेंदरी रंगाचा नंदी आहे. शिवलिंगावर पितळी कवच लावण्यात आले आहे.श्रींची मूर्ती अखंड शिळेवर कोरली आहे. पूर्ण शेंदूररचित मूर्ती चतुर्भूज असून मुषकावर विराजमान असल्याची नोंद आहे. उजवा पाय खाली सोडलेला असून डाव्या पायाची मांडी घातलेली आहे. चारही हातामध्ये पाश, अंकुश, मोदक आणि वरदहस्त आहे. शिरोभागी पंचमुखी शेषफणा आहे. मुखमंडळाच्या जागी नाकपुड्या, डोळे, मिशा, दाढी दिसत असून चेहरा भव्य आहे. मुखापासून सोंड निघाली असून डाव्या हातावरील मोदकाकडे वळण घेतलेली आहे. कमरेपासून गुडघ्याच्या पातळीवर महावस्त्राचा पदर व मेखला स्पष्ट दिसते. मेंढा या परिसरात गीरीवंशीय गोसावी लोकांच्या समाधी समूहाचा एक भाग आहे. या समाधीस्थानी सुंदर नक्षीकामे केलेली आहेत. या स्थळावर गणेशोत्सवाच्या काळात भाविकांची गर्दी होते. मात्र या भागाचा विकास झालेला नाही.बिनाछत्रधारी हनुमंतमहावीर हनुमंताची मूर्ती भृशुंड गणेश मंदिराच्या आवारात आहे. विशेष म्हणजे या मूर्तीवर कोणतेही छत्र नाही. मूर्तीच्या वर शामियाना किंवा पक्के बांधकाम केल्यास ते टिकत नाही अशी आख्यायीका आहे. त्यामुळेच हा हनुमंत बिना छत्रधारी आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ashtavinayakअष्टविनायक गणपती