फिरते पशुचिकित्सालयाची सुरुवात तुमसरातून होणार

By Admin | Updated: April 22, 2017 00:46 IST2017-04-22T00:46:45+5:302017-04-22T00:46:45+5:30

पशुपालन व्यवसायात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. म्हणून महाराष्ट्र राज्यात फिरते

It will start from the beginning of Veterinary College | फिरते पशुचिकित्सालयाची सुरुवात तुमसरातून होणार

फिरते पशुचिकित्सालयाची सुरुवात तुमसरातून होणार

भंडारा : पशुपालन व्यवसायात वाढ होवून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. म्हणून महाराष्ट्र राज्यात फिरते पशुचिकित्सालयाची सुरुवात तातडीने सुरु करण्यासंबंधाने आ. चरण वाघमारे यांनी २०१७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या पुरवणी मागणीच्या तासात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व मत्सविकास मंत्री महादेव जानकर यांनी फिरत्या पशुचिकित्सालयाची सुरूवात तुमसरातून करण्याचे आश्वासन दिले आहे.
आ.चरण वाघमारे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, शासनाने कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागासाठी अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतुद केलेली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ व्हावी याकरिता शेतकरी पट, शेतकरी उद्योगासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून फिरते विक्री पशुचिकित्सालय योजना सुरु झाली असून त्या योजनेची प्रायोगिक तत्वावर राज्यातील तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राची निवड करण्यात आली असून या योजनेची सुरुवात आ.चरण वाघमारे यांच्या प्रयत्नाने तुमसर येथून होणार आहे, असे आश्वासन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले.
पशुसंवर्धन मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याने पशुपालकांचे अच्छे दिन येण्यास सुरुवात होईल, असे आशावाद आ. वाघमारे यांनी व्यक्त केले.(नगर प्रतिनिधी)

Web Title: It will start from the beginning of Veterinary College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.