उत्पादन साधनांची मालकी प्रस्थापित करणे महत्त्वाचे
By Admin | Updated: May 8, 2017 00:27 IST2017-05-08T00:27:35+5:302017-05-08T00:27:35+5:30
भांडवलदारी खाजगी मालकीचा अंतकरुन उत्पादन साधनांची सामाजिक मालकी प्रस्थापित करणे हाच समतेच्या लढ्याचा कार्लमार्क्स यांनी सांगितलेला खरा मार्ग आहे ....

उत्पादन साधनांची मालकी प्रस्थापित करणे महत्त्वाचे
कार्ल मार्क्स जयंती : हिवराज उके यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भांडवलदारी खाजगी मालकीचा अंतकरुन उत्पादन साधनांची सामाजिक मालकी प्रस्थापित करणे हाच समतेच्या लढ्याचा कार्लमार्क्स यांनी सांगितलेला खरा मार्ग आहे असे प्रतिपादन कार्ल मार्क्स यांच्या जयंतीप्रसंगी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके यांनी केले आहे. कामगार वर्गाचा क्रांतीकारक गुरु कार्ल मार्क्स यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त ५ मे रोजी राणा भवन, भंडारा येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय महिला फेडरेशनच्या अध्यक्षा शांताबाई बावनकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान सभेचे अध्यक्ष सदानंद इलमे, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या डॉ. सुमन आराटे यांचे मार्गदर्शन झाले.
मार्क्सवादी तत्वज्ञानाबाबत बोलतांना हिवराज उके म्हणाले, जगप्रसिध्द भांडवल या ग्रंथात वरकळ मुल्यांचा सिध्दांत मांडून भांडवलदारी शोषणाविरुध्द कामगार चळवळीला शास्त्रशुध्द आधार देत आपल्या कम्युनिष्ट जाहिरनाम्यात जगातील कामगारांनो एक व्हा ही घोषणा बुलंद केली.
याच मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या आधारावर लेनिन यांनी सोविएत रशियामध्ये महान आॅक्टोबर समाजवादी क्रांती घडवून आणली. व अवघ्या १३ वर्षात गरीबी आणि बेकारी नष्ट केली. भारतालाच नव्हेतर अनेक नवस्वतंत्र देशांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास सर्व प्रकारची मदत केली व हिटलरशाहीचा अंत केला.
सदानंद इलमे म्हणाले की, मार्क्सवाद- लेनिनवादाच्या सिध्दांताने शोषणविहीन समताधिष्ठीत सामाजिक व्यवस्था निर्माण होवू शकते या साठी सर्व पुरोगामी, धर्मनिरपेक्ष व समाजवादी विचारांच्या शक्तींनी व किसान कामगार कष्टकऱ्यांनी आणि बेरोजगार युवक विद्यार्थ्यांनी संघटीत होऊ न संघर्ष केला पाहिजे असे आवाहन ही इलमे सरांनी केले. या प्रसंगी झुलनाबाई नंदागवळी यांनी ‘लहा उद्याची सकाळ आता श्रमिकांच्या नावे’ हे क्रांतीगीत सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे उपाध्यक्ष स्वप्नील भोवते यांनी केले. आभार गजानन पाचे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता प्रामुख्याने मोहनलाल शिंगाडे, जगतलाल अंबुले, रत्ना इलमे, वामनराव चांदेवार, सुरेश नागोसे, गौतम भोयर, श्रीवंता अंबुले, ताराचंद देशमुख, गोपाल चोपकर, राजकुमार मेश्राम यांचा समावेश होता.