सिंचन विहीर योजनेचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:37 IST2021-08-23T04:37:17+5:302021-08-23T04:37:17+5:30

२०२० मध्ये शासनाच्या जलसंधारण विभागअंतर्गत राज्यात १३ हजार पात्र शेतकऱ्यांना सिंचन विहीर धडक कार्यक्रमांतर्गत लाभ मंजूर करण्यात आला. या ...

Irrigation well scheme grant stalled | सिंचन विहीर योजनेचे अनुदान रखडले

सिंचन विहीर योजनेचे अनुदान रखडले

२०२० मध्ये शासनाच्या जलसंधारण विभागअंतर्गत राज्यात १३ हजार पात्र शेतकऱ्यांना सिंचन विहीर धडक कार्यक्रमांतर्गत लाभ मंजूर करण्यात आला. या मंजुरीनुसार तालुक्यातील जवळपास ९३ शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांनी लघु सिंचन उपविभागांतर्गत करारनामा करून कार्यारंभ आदेशाचे आधारावर बांधकाम सुरू केले. या बांधकामासाठी शासनाने कोणतेही अग्रिम अनुदान उपलब्ध न केल्याने शेतकऱ्यांनी उधार उसने करून बांधकामाचे साहित्य खरेदी करून बांधकाम चालविले. त्यानुसार तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे बांधकाम पूर्ण, तर काही शेतकऱ्यांचे बांधकाम प्रगतीत असल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने तब्बल वर्षभरापासून या योजनेचे अनुदान संबंधित विभागाला उपलब्ध न केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असल्याची बाब आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Irrigation well scheme grant stalled