तुमसरातील हनुमान नगर येथे पाणी पुरवठा अनियमित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST2021-07-01T04:24:22+5:302021-07-01T04:24:22+5:30
यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षानी त्वरित पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना दालनात बोलावून नागरिकांच्या पिण्याचे पाणी सुरळीत व्हावे यासाठी तातडीने समस्या ...

तुमसरातील हनुमान नगर येथे पाणी पुरवठा अनियमित
यावर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षानी त्वरित पाणी पुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांना दालनात बोलावून नागरिकांच्या पिण्याचे पाणी सुरळीत व्हावे यासाठी तातडीने समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सदर वार्डात जाऊन प्रत्यक्ष स्थळी पाण्याची पाहणी करून नळाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले. यावेळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे व उपाध्यक्षा गीता कोंडेवार यांना शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी निवेदन सादर करण्यात आले. तसेच सदर पत्राची प्रत जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासन अधिकारी भंडारा यांना देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, उपतालुका प्रमुख संतोष पाठक, शाखा प्रमुख निखील कटारे, अरुण डांगरे, शैला वाकरकर, चंद्रकला मलेवार, वनिता भुरे, बेबीनंदा वाकरकर, कल्पना शेंडे, ममता बडवाईक सह वार्डातील नागरिक उपस्थित होते.