शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

निधीअभावी पाटबंधारे विभाग खिळखिळा

By admin | Updated: December 29, 2014 01:00 IST

मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयावर नियंत्रण ठेवणारा सिहोरा येथील लघु पाटबंधारे विभाग (राज्य) चे कार्यालय निधीअभावी खिळखिळा झालेला आहे.

चुल्हाड (सिहोरा) : मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयावर नियंत्रण ठेवणारा सिहोरा येथील लघु पाटबंधारे विभाग (राज्य) चे कार्यालय निधीअभावी खिळखिळा झालेला आहे. या विभागाचे दोन्ही विश्रामगृह दुर्लक्षित झाले असून रिक्त पदे टेंशन वाढविणारे आहेत. याशिवाय कोट्यवधीची मालमत्ता रामभरोसे आहे.सिहोरा परिसरात शेती सुजलाम सुफलाम करणारा चांदपूर जलाशय आहे. या जलाशयाचे सिंचीत क्षेत्र ७,०२९ हेक्टर आर शेती आहे. ही शेती सिंचीत करण्यासाठी सिहोऱ्यात लघु पाटबंधारे विभाग (राज्य) चे कार्यालय आहे. या विभागात डावा आणि उजवा कालवा अशी विभागणी करण्यात आली असून स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. डावा कालवा यंत्रणेत शाखा अभियंत्याचे पद रिक्त आहे. या पदाचा प्रभार उजवा कालव्याचे शाखा अभियंता यांना देण्यात आलेला असून १०,११७ हेक्टर शेती सिंचित करण्याची जबाबदारी आहे. यामुळे कामाचा वाढता व्याप आहे. याच विभागाचे रनेरा गावाच्या हद्दीत विश्रामगृह आहे. विश्रामगृहाची जिर्ण अवस्था झाली आहे. अनेक इमारतींचे छतांना छिद्र पडली आहेत. विश्रामगृहात कुणी ढुंकूनही पाहत नाही. खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात पाणी वाटप करणारी शेतकऱ्यांची सभा या विश्रामगृहात वर्षातून एकदा बोलाविण्यात येत आहे. ही सभा आमदारांच्या उपस्थितीत होत आहे. सभा आटोपताच सारेच निघून जात आहे. परंतु विश्रामगृहाच्या देखभाल आणि दुरुस्तीकरिता प्रयत्न होत नाही. या विश्रामगृहाच्या परिसरात मौल्यवान सागवनाची वृक्ष आहेत. तारेचे कुंपण तुटल्याने ही वृक्ष आता असुरक्षित आहेत. याच आवारात वज्रचुर्ण भांडार गृह असून अवस्था जीर्ण झाली आहे. तुमसर बपेरा राज्य मार्गावर असलेल्या या विश्रामगृहाकडे कुणाचे लक्ष जात नाहीत ही खरी शोकांतिका आहे. या विश्रामगृहाचे नवीनकरण करण्यासाठी पाटबंधारे विभाग दरवर्षी वरिष्ठ विभागांना प्रस्ताव देत आहे. परंतु अद्याप प्रस्तावांना मंजुरी मिळाली नाही. निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. सध्या कोट्यवधीची ही मलामत्ता भंगारात जात आहे.वर्षानुनर्षे बांधकाम करण्यात आलेल्या खोल्याचे दरवाजे उघडण्यात आले नसल्याने गंज चढलेली आहेत. दस्तऐवज अस्तव्यस्त ठेवण्यात आली आहेत. याशिवाय पाटबंधारे विभागाचे साहित्य भंडारगृहात ठेवण्यात आली असली तरी सुरक्षा नाही. या परिसरात हा एकमेव विश्रामगृह आहे. विश्रामगृहाची सुरक्षा करणारी यंत्रणा नाही. यामुळेच साहित्य चोरट्याचे नजरा या विश्रामगृहाकडे खिळल्या आहेत. घाण, केर कचरा अस्वच्छता या विश्रामगृहात दिसून येत आहे.याच विभागाचे ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटन स्थळात विश्रामगृह आहे. पाणी वाटपात अधिकारी आणि कर्मचारी या विश्रामगृहाचा उपयोग करीत आहेत. विश्रामगृहात विजेची सोय आहे. परंतु पर्यटनस्थळ बंद होताच विश्रामगृहाची तोडफोड करण्यात आली आहे. दरवाजे आणि खिडक्या चोरीला गेलेल्या आहेत. सन २०१२ पर्यंत दर्जेदार असणारे हे विश्रामगृह आता भंगारात निघाले आहे. या परिसरात असणाऱ्या अन्य दोन इमारतीची दुरवस्था झाली आहे.सिहोरा स्थित कार्यालय परिसरात वसाहत बांधकाम करण्यात आली आहे. परंतु या वसाहतीत कर्मचारी वास्तव्य करीत नाही. याच परिसरातील गावात वास्तव्य करणारे कर्मचारी आहेत.यामुळे या कर्मचाऱ्यांचा अपडाऊन करण्याचा प्रश्न नाही. या वसाहतीत असणाऱ्या रिकाम्या खोल्या मंडळ कृषी कार्यालयाला प्रशासकीय कारभारासाठी देण्याची ओरड आहे. कृषी आणि पाटबंधारे विभाग राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत. रिकाम्या खोल्या भंगारात जाणे ऐवजी उपयोगात येतील अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत. दोन्ही विभागाचे उपविभागीय अधिकाऱ्यांनी तोडगा काढण्याची गरज आहे. (वार्ताहर)