वीरगतीप्राप्त सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 23:12 IST2018-03-25T23:12:51+5:302018-03-25T23:12:51+5:30
देशाचे रक्षण करीत असताना ज्या सैनिकांना विरगती प्राप्त झाली त्या सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.

वीरगतीप्राप्त सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घ्या
आॅनलाईन लोकमत
भंडारा : देशाचे रक्षण करीत असताना ज्या सैनिकांना विरगती प्राप्त झाली त्या सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच माजी सैनिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटना प्रयत्न करील असे प्रतिपादन शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे राज्याध्यक्ष चंद्रशेखर आलेगावकर यांनी केले.
पटवारी भवन भंडारा येथे पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना जिल्हा भंडाराची त्रेमासिक सभा आयोजित करण्यात आली होती .यावेळी सभेला मार्गदर्शन करताा आलेगावकर यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी संघटनेचे राज्य चिटणीस अजय चव्हाण, भंडारा जिल्हाध्यक्ष छगनलाल गायधने, सचिव रमेश लोहबरे, सल्लागार रामभाऊ साठवणे, सल्लागार सुधाकर लुटे, उपाध्यक्ष अरुण अतकरी, सहसचिव दिलीप खांदाळे, कोषाध्यक्ष आलोक बोरकर, संयोजक सुनिल गिºहेपुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेमध्ये माजी सैनिकांना ग्रॅज्युयटीचा लाभ, जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींचे वसतिगृह लवकरात लवकर तयार करणे, सीएसडी कॅन्टीन व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चिती बाबत चर्चा करण्यात आली. सर्व मागण्या लवकरात लवकर शासनाकडून पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित पदाधिकाºयांनी दिले. तसेच शासनातर्फे वीरगती झालेल्या सैनिकांचा पाल्यांना मोफत शिक्षणाची घोषणा केली असल्याची माहिती दिली. संचालन सुधाकर लुटे यांनी केले तर आभार रमेश लोहबरे यांनी मानले.