रोहयोच्या कामात संस्थांना सहभागी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:46+5:302021-03-07T04:32:46+5:30
१३ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या शासन निर्णयात रोजगार हमी योजनेच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसंदर्भात सामूहिक समूहांचा सहभाग घेण्याचा कल्याणकारी निर्णय ...

रोहयोच्या कामात संस्थांना सहभागी करा
१३ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या शासन निर्णयात रोजगार हमी योजनेच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीसंदर्भात सामूहिक समूहांचा सहभाग घेण्याचा कल्याणकारी निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाएनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून महाएनजीओ महाराष्ट्रातील दोन हजार स्वयंसेवी संस्थांच्या समूहाच्या माध्यमातून मागील तीन वर्षात १५० पेक्षा जास्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. नुकत्याच कोरोना परिस्थितीत राज्यातील तीन लाखापेक्षा अधिक नागरिकांना सहकार्य केले आहे. १ जून २०२० पासून आत्मनिर्भर भारत अभियान प्रेरित रोजगार हमी ते ग्रामविकास या उपक्रमावर कार्य करीत आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत याविषयी २०० पेक्षा अधिक संख्या ५०० पेक्षा अधिक गावात सेवाकार्य सुरू आहे. स्वयंसेवी संस्थेची कामे लक्षात घेता सदर संस्थांना संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाएनजीओ फेडरेशन भंडारा राज्य समन्वयक दिलीप बिसेन व भंडारा जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी सुरेश टिचकुले, डॉ. भगवान मस्के, राहुल निमजे, धम्मलेस सांगोडे, संदीप सिंगनजुडे, शैलेंद्र गणवीर, दिलहर बन्सोड, उमेश शेंद्रे, उत्तमराव कडपाते तसेच किशोर ठवकर यांनी केली आहे