गुंथारा मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण

By Admin | Updated: April 1, 2015 00:38 IST2015-04-01T00:38:01+5:302015-04-01T00:38:01+5:30

भंडारा तालुक्यातील गुंथारा रस्ता मधोमध ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

Invitation to the accident is giving potholes on the road to Gunthur | गुंथारा मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण

गुंथारा मार्गावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण

भंडारा : भंडारा तालुक्यातील गुंथारा रस्ता मधोमध ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याने पादचाऱ्यांना चालताना अथवा दुचाकीस्वाराने स्वत:चे वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. कधी कधी रस्त्यावरील खडा चुकविण्याच्या नांदात गाडीचे संतुलन बिघडून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. एवढे भयानक वास्तव्य असून संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच जनप्रतिनिधी यानी तत्काळ दखल घेवून रस्ता दुरूस्त करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गुंथारा हा मुख्य मार्ग आहेत. कंपनीचे ओव्हर लेंडेड ट्रक मोठ्या प्रमाणात जाणे येणे करितात. गुंथारा रस्ता आदी ठिकाणी जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने याच रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते. त्याच बरोबर दुचाकीस्वार याची सुद्धा मोठ्या संख्येने आवागमन असते. मात्र रस्त्याचा मधोमध खूप मोठ मोठे मागील कित्येक दिवसांपासून खड्डे पडल्याने लहान मोठे अपघात झाले आहे. गुंथारापासून तर खुर्शीपार मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून अपघाताला आमंत्रण देत आहेत तरी गुंथारा, खुर्शीपार, वाघबोडी, टेकेपार, माडगी, रावणवाडी, पिंपळगाव आदी गावेच जनता मोठ्या प्रमाणात जाणे येणे करिता विशेष विद्यार्थी सकाळी मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालय, आईटीआय मोठ्या प्रमाणात जाताना त्याची दुचाकी नेहमी पंचर होत असते. गुंथारा रस्त्याला दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी व जनता आणि इतर गावाचे जनता मोठ्या प्रमाणात करीत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Invitation to the accident is giving potholes on the road to Gunthur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.