गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: April 27, 2017 00:34 IST2017-04-27T00:34:54+5:302017-04-27T00:34:54+5:30

दाम दुप्पट पैसे करून देण्याच्या नावावर आर्थिक फसवणूक करणाऱ्या जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कंपनीची संपत्ती जप्त करून गुंतवणुकदारांची रक्कम त्यांना देण्यात यावी,....

Investor's dare movement | गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

गुंतवणूकदारांचे धरणे आंदोलन

मुख्यमंत्र्यांना निवेदन : प्रकरण जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडियाचे
भंडारा : दाम दुप्पट पैसे करून देण्याच्या नावावर आर्थिक फसवणूक करणाऱ्या जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कंपनीची संपत्ती जप्त करून गुंतवणुकदारांची रक्कम त्यांना देण्यात यावी, बाहेर असलेल्या आरोपींना अटक करण्यात यावी, ज्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे तिथे गुन्हे दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात यावे, या मागण्यांसाठी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी सामाजिक कार्यकर्ते विष्णूदास लोणरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कचेरीसमोर आंदोलन केले.
यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे अहवाल पाठविला होता. त्या अहवालानुसार कारवाई करण्यात यावी, असेही आंदोलकांचे म्हणने आहे. जे.एस.व्ही. कंपनीने दाम दुप्पट करून देण्याच्या नावावर आर्थिक फसवणूक केली आहे. रक्कम परत मिळावी म्हणून उपोषण, धरणे केले. ८ डिसेंबर २०१६ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून गृह राज्यमंत्री दीपक केसकर यांना निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी संचालकांची संपत्ती जप्त करून गुंतवणूकदारांचे रक्कम परत करण्याचे तसेच सर्व गैरअर्जदारांना अटक करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव यांना जे.एस.व्ही. कंपनीच्या संचालकांची संस्थेच्या नावाने असलेली मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव पाठविला. ती मालमत्ता महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थामधील) हित संबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ नुसार संपत्ती जप्त करून ग्राहकांची रक्कम मिळण्यात यावी, म्हणून मालमत्ता जप्तीचे आदेश व अधिसूचना मिळण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला केली आहे. ५ डिसेंबरपासून कारवाई न झाल्यामुळे पिळवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात मधुकर येरपुडे, ज्ञानेश्वर निकुरे, शामलाल काळे, रमेश बोंदरे, टेकराम मेश्राम, सूरज कुथे, केशवराव बिसने, कन्हैया नागपुरे, विक्रांत तिडके, सलीम पठाण, कल्पना जावळकर, वनिता चवळे, अनिता भुरे, चंद्रभागा कोळवते, छाया राऊत, शैलेश बोंदरे, अविनाश बेलेकर, गिरीधर गभने, प्रमोद येल्लजवार, नुजहत शेख, मकबुल वारशी, वर्षा बोंदरे व गुंतवणूकदार उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Investor's dare movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.