‘त्या’ गैरव्यवहाराची चौकशी थंडबस्त्यात

By Admin | Updated: March 4, 2016 00:40 IST2016-03-04T00:40:06+5:302016-03-04T00:40:06+5:30

तालुक्यातील एका डॉक्टरनी शेअर्सच्या नावाखाली अनेकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा दिला असून या कामासाठी त्याने काही एजेंटसुद्धा नियुक्त केले होते.

The 'investigation of the error' in the cold water | ‘त्या’ गैरव्यवहाराची चौकशी थंडबस्त्यात

‘त्या’ गैरव्यवहाराची चौकशी थंडबस्त्यात

वसुलीसाठी एजंट : कोट्यवधींचा हिशेब निनावीच
संजय साठवणे साकोली
तालुक्यातील एका डॉक्टरनी शेअर्सच्या नावाखाली अनेकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा दिला असून या कामासाठी त्याने काही एजेंटसुद्धा नियुक्त केले होते. हा सर्व प्रकार भुलथापा देवून करण्यात आला. मात्र या प्रकरणाची चौकशी करण्यात प्रशासन असमर्थ ठरत आहे. त्यामुळे यातील डॉक्टर अजुनही मोकाटच फिरत आहे.
साकोली परिसरातील एकोडी बाम्पेवाडा या भागात डॉक्टरकीचा व्यवसाय करणाऱ्या एका डॉक्टराने भोड्या भागड्या लोकांना शेअर्सच्या नावाखाली लोकाकडून लाखो रूपये लुबाडले. काही दिवस लोकांना डॉक्टरने ईमाने इतबारे रीटर्नही बरोबर दिले. मात्र त्यानंतर अचानक पैसे देणे बंद करण्यात आले. लुबाडणुक करणारा डॉक्टरही बेपत्ता झाला. तरीही हा डॉक्टर आता पैसे परत करणार या आशेवर गुंतवणुकदार आहेत तर काही आपल्या नशिबाला दोष देत आहेत. या प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा असली तरी आरोपी पसार आहे.

Web Title: The 'investigation of the error' in the cold water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.