महिला अत्याचाराचा तपास एलसीबीकडे सोपवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:32 IST2018-11-14T22:31:36+5:302018-11-14T22:32:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : लाखनी तालुक्यातील मासलमेटा येथील ४० वर्षीय विवाहितेचे आपत्तीजनक फोटो काढून तिच्यावर चार वर्ष लैंगिक ...

महिला अत्याचाराचा तपास एलसीबीकडे सोपवा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लाखनी तालुक्यातील मासलमेटा येथील ४० वर्षीय विवाहितेचे आपत्तीजनक फोटो काढून तिच्यावर चार वर्ष लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास थंडबस्त्यात आहे. महिना लोटूनही आरोपी मोकाट फिरत आहे. तपासात दिरंगाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याला निलंबित करुन तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता परमानंद मेश्राम यांनी येथे पत्रपरिषदेतून केली.
मासलमेटा येथील विवाहितेची २०१४ मध्ये प्रकृती बिघडली होती. त्यावेळी रामनाथ कुंजीलाल पारधी (४५) रा. मासलमेटा हा तिच्या घरी गेला. औषधाच्या नावाखाली त्याने एक गोळी तिला खाण्यास दिली. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यावेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्याचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर सदर फोटो दाखवून तिच्यावर सतत चार वर्ष अत्याचार केले. हा प्रकार पतीला सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. विवाहितेचे आपत्तीजनक फोटो अनेकांच्या मोबाईलवर पाठविले.
गंभीर गुन्हा असताना लाखनी पोलीसांनी तपासकार्य थंडबस्त्यात आहे. तपास सोडून तपासी अधिकारी पुणे येथे प्रशिक्षणाला गेल्या आहेत. या प्रकरणाला महिना लोटूनही पोलीसांकडून तपास कार्याला सुरुवात करण्यात आली नाही. घटनेचे गांभिर्य पाहून व तपासात दिरंगाई लक्षात घेता तपास एलसीबीकडे सोपविण्यात यावे, एलसीबीकडे महिला पोलीस अधिकारी नसेल तर, कोणत्याही एलसीबी शाखेतील महिला अधिकाºयाकडे तपास देण्यात यावे, अशी मागणी मेश्राम यांनी केली.