संघटित शक्तीचा परिचय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST2021-09-02T05:16:01+5:302021-09-02T05:16:01+5:30

तुमसर तालुक्यातील गर्राबघेडा, अंबागड जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदारांनी केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी ...

Introduce organized strength | संघटित शक्तीचा परिचय द्या

संघटित शक्तीचा परिचय द्या

तुमसर तालुक्यातील गर्राबघेडा, अंबागड जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदारांनी केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. योजना ग्रामीण भागातील गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्याचे आहे. कुठलाही राजकीय पक्ष हा कार्यकर्त्यांशिवाय मोठा होत नाही. कार्यकर्ते संघटित शक्तीचा परिचय देतात तो पक्ष कधीही पराभूत होऊ शकत नाही, असे सांगितले. यावेळी माजी म्हाडा सभापती तारीक कुरेशी, माजी आमदार चरण वाघमारे, तालुकाध्यक्ष अनिल जिभकाटे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शांताराम चाफले, जिल्हा महामंत्री प्रतिभा ठाकूर, गर्राचे सरपंच गोपीचंद गायकवाड, उपसरपंच राजेश पटले, हिरालाल रोडगे, प्रकाश दुर्गे, हरेंद्र रहांगडाले, डॉ. गोविंद कोडवाणी, संदीप टाले, राजेश ठाकूर, ललित शुक्ला, हंसराज आगाशे, हरिचंद बंधाटे, पिंटू सिंग उपस्थित होते.

Web Title: Introduce organized strength