साकोली तहसील कार्यालय ईमारत बांधकामात अडथळा
By Admin | Updated: November 26, 2014 23:01 IST2014-11-26T23:01:35+5:302014-11-26T23:01:35+5:30
मागील दोन तीन वर्षांपासून साकोली तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी वादविवाद सुरू आहे. अखेर शासनस्तरावरून काम मंजुर झाले आहे. त्यामुळे दोन तीन दिवसांपासून

साकोली तहसील कार्यालय ईमारत बांधकामात अडथळा
साकोली : मागील दोन तीन वर्षांपासून साकोली तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी वादविवाद सुरू आहे. अखेर शासनस्तरावरून काम मंजुर झाले आहे. त्यामुळे दोन तीन दिवसांपासून या कामाला सुरवातही झाली. ग्रामपंचायत सदस्य हेमंत भारद्वाज यांनी हे काम अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे काम पुर्ववत सुरू केले.
साकोली येथील महामार्ग चौपदरी करणाच्या कामानंतर साकोली तहसील कार्यालयाची इमारत गडकुंभली रस्त्यावरील जागेवर तयार करण्यात येणार असे निश्चित झाले. तत्कालीन तहसीलदार राजू रणवीर यांनी जागेसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही पुर्ण केली. मात्र गावातील काही लोकांनी ही तहसील कार्यालयाची ईमारत आहे त्याच ठिकाणी तयार करा, अशी मागणी केली व स्थगनादेश आणला होता.
याला दोन वर्षाचा कालावधी लोटला. आता दोन तीन दिवसापूर्वी गडकुंभली रस्त्यावरील जागेवरच ही इमारत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. सध्या या जागेवर जेसीबीच्या सहायाने खोदकाम सुरू आहे. हे काम पाहण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार व शाखा अभियंता गोबाडे तिथे हजर होते. दरम्यान ग्रा.पं. सदस्य हेमराज भारद्वाज यांनी हे खोदकाम बंद करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक खारतोडे ताफ्यासह पोहचले. त्यांनी काम पुर्ववत सुरू केले. यावेळी नायब तहसीलदार दीनकर खोत, मंडळ अधिकारी बन्सोडे व तलाठीही हजर होते. सरपंच हेमलता परसगडे, महादेव कापगते, नितीन खेडीकर, ललीता खराबे, कोटांगले, शारदा वाडीभस्मे, सविता शहारे आदी त्या ठिकाणी पोहचले. मात्र यावरही काम बंद केले नाही, असे या सदस्याचे मत आहे. (तालुका प्रतिनिधी)