जर्मनीच्या विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद
By Admin | Updated: February 8, 2016 00:44 IST2016-02-08T00:44:28+5:302016-02-08T00:44:28+5:30
येथील जिल्हा परिषद हायस्कुल व लेमन्युटकेल स्कुल जर्मनी या शाळेसोबत गुरुवारी, व्हीडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली.

जर्मनीच्या विद्यार्थ्यांसोबत साधला संवाद
व्हिडिओ कॉन्फरन्स : जिल्हा परिषद हायस्कूलचा उपक्रम
साकोली : येथील जिल्हा परिषद हायस्कुल व लेमन्युटकेल स्कुल जर्मनी या शाळेसोबत गुरुवारी, व्हीडीओ कॉन्फरन्स घेण्यात आली. इयत्ता ८ वी च्या विद्यार्थ्यांसोबत लेमन्युत्केल स्कुल जर्मनी या शाळेतील विद्यार्थ्यांशी 'छंद व रिकाम्या वेळेचा उपयोग' या विषयावर संवाद साधला.
विषयाला अनुसरुन दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांनी एकमेकांना प्रश्नोत्तर केली. दोन्हीकडील विद्यार्थ्यांनी आपापल्या भाषेतील राष्ट्रगीत सादर केलेत.
यात आकांक्षा चव्हाण, काजल भेंडारकर, प्रियंका करंजेकर, रिता भेंडारकर, दिव्या येरणे, अंजली बन्सोड, देवयानी लंजे, नयन द्रुगकर, गौरी कठाणे, कृपा खंडागळे, रोहिणी हांडे, नेहा रघुवंशी, आचल नंदेश्वर, मानसी शहारे, तन्वी समरीत, मृणाल कापगते, अनुष्का देशमुख, प्रेरणा इटवले, प्रगती जनबंधू, युक्ती चौधरी, आचल सावरकर, पल्लवी हत्तीमारे, पूर्वेश मस्के, हिमांशू रामटेके, आयुष रामटेके, वैभव शहारे, लोकेश मेंढे, अथर्व पळसकर, तनय भिवगडे, हासीम शेख, कांचन खोटेले, ओहान बडोले या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
संचालन लेमन्युटकेल स्कुल जर्मनी या शाळेतील ज्युलीया यांनी केले. संचालन जिल्हा परिषद हायस्कुल शाळेतील मुख्याध्यापक रवी मेश्राम व अरुण पारधी यांनी केले. याप्रसंगी शाळेचे शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)