रक्षाबंधनाला दिले विमा सुरक्षेचे कवच
By Admin | Updated: September 1, 2015 00:33 IST2015-09-01T00:33:46+5:302015-09-01T00:33:46+5:30
रक्षाबंधनाचे महत्व सर्वांना माहित आहे. आयुष्यात मदतीकरिता चार माणसे सहज मिळतील.

रक्षाबंधनाला दिले विमा सुरक्षेचे कवच
वरठी : रक्षाबंधनाचे महत्व सर्वांना माहित आहे. आयुष्यात मदतीकरिता चार माणसे सहज मिळतील. पण पैसे उभारण्याकरिता सामान्य माणसाला मोठी कसरत करावी लागते. आर्थिक सुरक्षा ही शारीरिक सुरक्षेपेक्षा गरजेची आहे. म्हणून वेळप्रसंगी सर्वांना आर्थिक सहाय्यता उपलब्ध व्हावी याकरिता वरठी येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधुन गावातील २३५ कुटूंबीयाचे सुरक्षा विमा योजनेचे फार्म भरुन घेतले. यासाठी येणारी प्रथम किस्त त्यांनी स्वत:च्या पैशाने भरले. पुढील दोन दिवसात गावातील एक हजार कुटूंबीयांना या योजनेत आणण्यासाठी त्यांचा प्रवास आजही सुरु आहे.
काल रक्षाबंधनात होते. सर्वांना ह्या दिवसाची उत्सुकता होती. वर्षातून एकदा येणाऱ्या बहिणीचे आकर्षण व भेट खास होती. रक्षाबंधन हे सुरक्षेचे वचन म्हणून आपण साजरे करतो. सर्वांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताकरिता आतून असल्यामुळे सहजासहजी आपण बाहेर पडत नाही. पण वरठी येथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे, मिलिंद धारगावे व पूनम बालपांडे हे सकाळपासून गावात घरोघरी फिरले. सर्व सामान्यांच्या घरी शासनाच्या योजना व लाभ सुर्याच्या प्रकाशाप्रमाणे उशिरा पोहचतात. राबराबणारे कष्टकरी माणूस व त्यांच्या कुटूंबीयाचे दीवस व रात्र, सण व उत्सव एकसारखे जातात. याची जाणीव असल्यामुळे यांनी घरोघरी जावून सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा कवच देण्याचे ठरवले.
कठीण प्रसंगी हातात पैसा नसल्यास सुरक्षेचे सर्व साधणे काळून पडतात. यासाठी आर्थिक सुरक्षा महत्वाची आहे. त्याच उद्देश समोर ठेवून वरठी येथील शास्त्री सुभाष व डॉ. आंबेडकर वॉर्डातील घरोघरी जावून यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व जीवन ज्योती योजनेची माहिती दिली. यातून मिळणारे लाभ समजावून सांगण्यात आले. माहिती देताना केंद्र शासनाची योजना ही राजकीय पक्षवाद यातून सर्व सामान्याच्या फायदयाची कशी याची माहिती देण्यात आली. आर्थिक सुरक्षेचा प्रश्न मिटला की मनस्ताप आणि मानसाच्या चिंता आपोआप कमी होतात. धकाधकीच्या जीवनात कुटूंब प्रामुख्याने बरेवाईट झाल्यास कुटूंब उघड्यावर पडते. यामुळे सर्वांनी स्वत:ची आर्थिक सुरक्षा करुन घ्यावे असे आवाहन करुन इच्छुक कुटूंबाकडून त्यांनी विमा योजनेचे फार्म भरुन घेतले. याकरिता येणारी प्रथम किस्त सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र देशमुख, पुनम बालपांडे, मिलिंद धारगावे व पुष्पा भुरे स्वत: बँकेत जमा करणार आहेत. घरोघरी जावून माहिती देवून ५०० च्या जवळपास कुटूंबीयांचे अर्ज भरुन घेतले. आजही त्यांचा प्रवास सुरुच होता. एक हजार कुटुंबीयांचे फार्म भरुन देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)