गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे निर्देश

By Admin | Updated: December 18, 2014 00:36 IST2014-12-18T00:36:59+5:302014-12-18T00:36:59+5:30

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्याच्या ...

Instructions to solve the problems of Gosikhurd project affected people | गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे निर्देश

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याचे निर्देश

गोसे (बुज.) : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे प्रकल्पग्रस्त व अधिकाऱ्याच्या झालेल्या सभेमध्ये जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले तर जे शासनस्तरावरचे प्रश्न आहेत त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यास अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या सभेमध्ये गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे सयंोजक विलास भोंगाडे यांनी प्रत्येक गावठानात सामाजिक प्रार्थना स्थळाकरिता भुखंड उपलब्ध करुन दयावे, गावठानातील रस्ते खराब झाले ते दुरुस्त करुन दयावे, पोच मार्गाचे डामरीकरन करुन दयावे, व्यापार संकुल बांधुन दयावे, बेरोजगारांसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करुन दयावा, नौकरी ऐवजी एकमुस्त १५ लक्ष रुपये दयावे आदी मागण्या केल्या.
वरिष्ठ नेते विठोबा समरीत युवा नेते सामेश्वर भुरे, धर्मराज भुरे, परशुराम समरीत आदीनी पाथरीच्या समस्या व राजेश्वर सामृतवार यांनी सावरगावच्या विनोद शेंडे यांनी सौंदडच्या समस्या मांडल्या, गुलाब मेश्राम यांनी इटीमीटी बांड करारनाम्याचे प्रश्न मांडले.
जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी अधिकाऱ्याना प्रकल्पग्रस्तांना तातडीने पुनर्वसन पॅकेज वाटपाचे पैसे वाटपाचे निर्देश देवून जे वादातील प्रकरणे आहेत. त्याची सुनावणी घेण्यास सांगितले. स्पर्धा मार्गदर्शन वर्गात प्रकल्पग्रस्तांत मार्गदर्शन करण्याचे, संगम पोच रस्ता तयार करण्याचे, बेरोडी मधील भुखंड वाटप करण्याचे, गावठानातील भुखंडावरुन गेलेल्या विद्युत तारा काढण्याचे पाथरी सह अन्य गावातील प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले.
तसेच नोकरीऐवजी १५ लक्ष रुपयाच्या पॅकेजच्या धरणातील पाण्याच्या विक्रीच्या नफयातील ७५ टक्के रक्कम प्रकल्पग्रस्तांसाठी खर्च करावी, आदी मागण्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश देवून प्रकल्पग्रस्तांची पुढील सभा वाही विश्रामगृह येथे घेण्यासा सांगितले.
या सभेला जिल्हापुनर्वसन अधिकारी विजया बनकर, भुअर्जन अधिकारी जोशी विशेष भुअर्जन अधिकारी धार्मिक, गोसीखुर्द धरणाचे कार्यकारी अभियंता वर्धने, उपकार्यकारी अभियंता भाटीया आदी विविध अधिकाऱ्यासह प्रकल्पग्रसत उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Instructions to solve the problems of Gosikhurd project affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.