शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छंद मैदानी खेळांऐवजी बालकांच्या हाती आला स्मार्टफोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही.

ठळक मुद्देबालपण हरविले : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलने कोमेजतेय बालपण, मुलांना घराबाहेर जाऊ देण्यास पालकांचाही नकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तीन दशकापूर्वीचा काळ आठवा. गावातील मैदान मुलांनी फुलून गेलेले असायचे. कबड्डी, हुतूतू, विटीदांडू असे खेळ रंगलेले असायचे. स्वच्छंद मैदानी खेळात बालपण रमून जायचे. मात्र अलिकडे आधुनिक तंत्रज्ञानात क्रांती झाली. प्रत्येकाच्या घरी स्मार्टफोन आला. नकळत चिमुकल्यांनी मोबाईलचा ताबा घेतला आणि अख्खे बालपणच हरवून गेले. मुलांना मोबाईलचे एवढे वेड लागले की, आता त्यांच्यापुढे पालकांनीही हात टेकले आहे.‘रम्य ते बालपण’ असे म्हटले जाते. बालपणीच्या आठवणीत रमायला प्रत्येकालाच आवडते. तीन दशकापूर्वी विद्यार्थी आणि मैदानाचे नाते अतूट होते. शाळा सुटली की, मैदान गाठायचे. मनसोक्त खेळायचे आणि सायंकाळीच घरी परतायचे, असा दिनक्रम असायचा. गावातील असो की, शहरातील मैदान बालकांनी गजबजून गेलेले असायचे.आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र होत आहे. संवादाचे माध्यम असलेला मोबाईल स्मार्ट झाला. चैनीची वस्तू असलेला मोबाईल प्रत्येकाची गरज झाला आहे. त्यामुळेच गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या हातात आता फोन दिसत आहे. या फोनने जीवन सुखकर होत असले तरी त्याच्या दुष्परिणामांचाही तेवढाच सामना करावा लागत आहे. सर्वप्रथम शालेय विद्यार्थी मोबाईलच्या जाळ्यात अडकले. तासन्तास मोबाईलमध्ये अडकलेले विद्यार्थी कुठेही दिसून येतील. विद्यार्थीच काय शाळेत न जाणारे तीन चार वर्षाचे चिमुकलेही आता मोबाईलसाठी रडताना घरात दिसून येतात. मला जेवढे मोबाईलमधले कळत नाही त्यापेक्षा अधिक आमच्या मुलाला कळते असे अभिमानाने सांगायचे, परंतु आता मुलं अभ्यासापेक्षा मोबाईलमध्येच जास्त वेळ घालवत असल्याने पालकांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.मोबाईलचे वेड एवढे वाढले आहे की, मुले आपले पालक घरी येण्याची तासन्तास प्रतीक्षा करीत असतात. वडील अथवा आई घरी आल्याच्या आनंदापेक्षा मोबाईल आपल्या हातात आला याचाच अधिक आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतो. अनेक पालकांनी आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आल्याचे दिसत नाही. उलट अनेक पालक आपल्या मुलांना मैदानावर खेळायला जाण्यास मज्जाव करीत असल्याचे दिसत आहे.आधुनिक पिढीही टेक्नोसॅव्ही झाली आहे. कोणतीही गोष्ट झटपट करण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र हे तंत्रज्ञान आता विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. अनेकांना डोळ्याच्या आजारासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अभ्यासात मुले माघारात असल्याच्याही तक्रारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. मोबाईलने संपूर्ण बालपणच हिरावून घेतल्याचे सध्यातरी घराघरात चित्र आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMobileमोबाइल