तुमसरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:07+5:302021-04-15T04:34:07+5:30
गरिबांना हे परवडणारे नाही. एकच सीटी स्कॅन येथे असल्याने रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. रुग्णांच्या रांगा येथे दिसतात. गर्दीमुळे ...

तुमसरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन लावा
गरिबांना हे परवडणारे नाही. एकच सीटी स्कॅन येथे असल्याने रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. रुग्णांच्या रांगा येथे दिसतात. गर्दीमुळे अनेक रुग्णांना भंडारा येथे जावे लागत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा मानसिक व आर्थिक मनस्ताप होत आहे. तिथेही एक ते दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे.
शासनाच्या आरोग्य विभागाने विविध उपचारासाठी काही दर नेमून दिले आहेत. परंतु तुमसर येथे शासनाच्या दरानुसार पैसे न घेता मनमर्जीने पैसे घेऊन गरीब वंचित रुग्णांची लूटमार थांबवून शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे सिटी स्कॅन मशीन लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनात तुमसरचे सामाजिक कार्यकर्ता जय डोंगरे यांनी केली आहे.