शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:19+5:302021-03-07T04:32:19+5:30
प्रतिनिधींच्या समक्ष धानाची व शेतकऱ्यांची तपासणी करून धान खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रांना देण्यात आले. दैनंदिन शेड्युल प्रमाणे ...

शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांची तपासणी
प्रतिनिधींच्या समक्ष धानाची व शेतकऱ्यांची तपासणी करून धान खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रांना देण्यात आले. दैनंदिन शेड्युल प्रमाणे शेतकऱ्यांचा धान घेण्यात यावा आणि खरेदी व्यवहाराचे कामकाज सुरू राहावे, याची नोंदणी रजिस्टरवर करण्यात यावी, असे अधिकाऱ्यांनी केंद्र चालकांना सांगितले.
या वेळी जिल्हा पणन कार्यालयाचे वरिष्ठ साहाय्यक अंबादास श्रीमाली, कार्यालय साहाय्यक रवींद्र फुटाणे, अविनाश निमकर यांच्यासह संबंधित सोसायटीचे अध्यक्ष अमित मेश्राम, व्यवस्थापक दिगंबर समरीत, ग्रेडर राकेश काळे, केंद्र साहाय्यक निखिल वंजारी, नीलेश गौपाले, जगदीश त्रिभुवनकर, शेतकरी दुलीचंद दमाहे, उमेश राहांगडाले, राजवंती बिसने, जगराम बावणे, देवनाथ मेशराम यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.