धान व ऊस पिकांवर किडींचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 05:00 AM2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:27+5:30

ऊस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून शासनाने सर्वे करून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. अतीपावसामुळे हलके धानाला कीड लागली आहे. ऊसाला सुद्धा अळ्या लागल्या आहेत. येथील शेतकरी हवलादिल झाला आहे.

Insect invasion of paddy and sugarcane crops | धान व ऊस पिकांवर किडींचे आक्रमण

धान व ऊस पिकांवर किडींचे आक्रमण

Next
ठळक मुद्देतुमसर तालुक्यात ओला दुष्काळाचे सावट : पिकविमा मंजूर करून आर्थिक मदतीची शेतकऱ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ऊस व धान उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून शासनाने सर्वे करून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. अतीपावसामुळे हलके धानाला कीड लागली आहे. ऊसाला सुद्धा अळ्या लागल्या आहेत. येथील शेतकरी हवलादिल झाला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची मागणी बाजार समितीचे संचालक व पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तुमसर तालुका धान उत्पादकांचा तालुका म्हणून प्रसिध्द आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. हलक्या धानाच्या शेतात पाणी साचल्याने ते कुजल्यासारखे झाले आहे. काही धान पिकांची दुर्गंधी येत आहे. धानावर किडीचा प्रादूर्भाव वाढला आहे. ऊसाला सुद्धा किडीने ग्रासल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकºयांवर संकटाची स्थिती ओढावली आहे. ओला दुष्काळासारखी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शासनाने धान व ऊस पिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे तयार करावे, शेतकऱ्यांनी पिकांची पिकविम्याची रक्कम मंजूर करून तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
तालुक्यात मागील काही वर्षापासून पाऊस कमी पडत होते. त्यामुळे यावर्षी शेतकºयांनी हलके धानाची लागवड केली, परंतु यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसला. त्याचा फटका धानपिकाला बसला. धान उत्पादक व ऊस उत्पादक शेतकºयांना सध्या आर्थिक मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कृषी विभागाकडून किटकनाशकांची मागणी
भंडारा जिल्ह्यात धान व ऊस पिकांवर किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकरी कृषीकेंद्रातून महागडी किटकनाशके खरेदी करून पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. पूर्वीच अतीपावसामुळे हलक्या धानाची नासाडी होत आहे. तर दुसरीकडे किडींचा प्रादूर्भाव शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. या अगोदर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून नि:शुल्क किटकनाशके वितरीत करण्यात येत होते. मात्र यावर्षी अद्यापही विभागाकडे किटकनाशके उपलब्ध झालेली नाहीत.

Web Title: Insect invasion of paddy and sugarcane crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती