२०० कोटींच्या वीज बिल माफप्रकरणाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:00 AM2019-12-04T06:00:00+5:302019-12-04T06:00:55+5:30

उर्जा विभागाने कराराचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे. सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कारखाना सुरु करण्यासाठी या पूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी मोठे आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नाही. आज येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.

Inquiry to waive Rs 200 crore electricity bill | २०० कोटींच्या वीज बिल माफप्रकरणाची चौकशी

२०० कोटींच्या वीज बिल माफप्रकरणाची चौकशी

Next
ठळक मुद्देयुनिव्हर्सल फेरो : १७ वर्षांपासून कारखाना बंद, दीड हजार कामगार बेरोजगार

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मॅग्निज शुद्ध करणाऱ्या युनिव्हर्सल फेरो कारखान्याचे तब्बल २०० कोटी रुपयांचे वीज बिल शासनाने माफ केले होते. त्यानंतरही हा कारखाना सुरु झाला नाही. करारभंगाची गंभीर दखल घेत या प्रकरणाची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती आहे.
तुमसर जवळ युनिव्हर्सल फेरो हा मॅग्निज शुद्ध करणारा कारखाना आहे. परंतु गत १७ वर्षांपासून तो बंद आहे. या कारखान्याचे दीड हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. कारखाना सुरु करण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले. त्याअंतर्गत साडेतीन वर्षापूर्वी राज्याच्या उर्जा मंत्रालयाने पुढाकार घेत आजारी कारखान्यांचे वीज बिल माफ केले होते. त्यात तुमसरच्या युनिव्हर्सल फेरो कारखान्याचाही समावेश होता. वीज बिल माफ करताना कारखाना सुरु करण्याची अट होती. अटीच्या अधीन राहूनच वीज बिल माफ करण्यात आले. परंतु तीन वर्षानंतरही कारखानदाराने कारखाना सुरु केला नाही.
उर्जा विभागाने कराराचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल आहे. सध्या सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कारखाना सुरु करण्यासाठी या पूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांनी मोठे आंदोलन केले होते. परंतु त्यानंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नाही. आज येथील कामगार बेरोजगार झाले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होणार असल्याने त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. या प्रकरणाची आता चौकशी होणार असल्याने संबंधित विभागात खळबळ उडाली असून काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
आजारी कारखाने पुनरूज्जीवनाला वेग
राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजारी कारखान्याचे पुनरूज्जीवन करण्याचे सुतोवाच केले. त्या अनुषंगाने युनिव्हर्सल कारखाना सुरु होण्याच्या बाबीला बळ मिळाले आहे.
आदित्य ठाकरे चांदपूरला येणार
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे तुमसर तालुक्यातील प्रसिद्ध चांदपूर येथील हनुमंताच्या दर्शनाला येणार असल्याची माहिती आहे.त्यांनी चांदपुरच्या हनुमानाचे फोटो आणि माहिती मागितली आहे. त्यांची भेट घेऊन युनिव्हर्सल फेरो कारखान्याचे वीज बिल माफ प्रकरणाची माहिती दिली जाणार आहे.

Web Title: Inquiry to waive Rs 200 crore electricity bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज