शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अद्यापही नाली बांधकामाची चौकशी थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

निवेदनानुसार, ग्रामपंचायत सोमलवाडा मेंढा येथे २०१९-२० या वर्षात चौदा वित्त आयोगामार्फत जिल्हा परिषद शाळा ते विष्णू फंदे यांच्या घरापर्यंत नाली बांधकामाची प्रशासकीय मंजुरी जिल्हा प्रशासनाअंतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आली.

ठळक मुद्देसोमलवाडा येथील प्रकार : चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा, कारवाईकडे नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी तालुक्यातील सोमलवाडा (मेंढा) ग्रामपंचायतीमार्फत २०१९-२० या वर्षात चौदा वित्त आयोग योजनेमधून वॉर्ड क्रमांक एकमध्ये निकृष्ठ दर्जाचे नालीचे बांधकाम करून शासकीय निधीचा दुरूपयोग केल्याची तक्रार जिल्हा व तालुका प्रशासनाकडे करण्यात आली. मात्र महिनाभराचा कालावधी लोटूनही चौकशी थंडबस्त्यात आहे. याप्रकरणाची लवकर चौकशी करावी, अन्यथा आमरण उपोषणचा इशारा श्रीकांत नामदेवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातू दिला आहे.निवेदनानुसार, ग्रामपंचायत सोमलवाडा मेंढा येथे २०१९-२० या वर्षात चौदा वित्त आयोगामार्फत जिल्हा परिषद शाळा ते विष्णू फंदे यांच्या घरापर्यंत नाली बांधकामाची प्रशासकीय मंजुरी जिल्हा प्रशासनाअंतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आली. सदर बांधकामाचा शासकीय निधी चार लक्ष ६६ हजार रुपये इतका होता. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाने या नाली बांधकामातून काही भाग म्हणून वॉर्ड क्रमांक एकमध्ये किशोर बुराडे ते प्रभू हुमणे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करण्यात आली. त्यामुळे वॉर्ड क्रमांक दोनचे काम वॉर्ड क्रमांक एकमध्ये करण्यात आले. वॉर्ड क्रं. दोनचे बांधकाम वॉर्ड क्रमांक एकमध्ये करता येतो काय, या संबंधाचे शासन निर्णय ग्रामपंचायतीला मागण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायतीने ते दिलेले नाहीत.प्रभू हुमणे ते किशोर बुराडे यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम करण्यात आले. सदर कामाचे ठराव न घेता बांधकाम करण्यात आले. बांधकाम झाल्यानंतर दीड महिन्यातच नालीच्या बांधकाम निकृष्ठ दर्जाचा असल्यामुळे नाली तुटली. प्रत्यक्षात नालीची लांबी नुसार काम करण्यात आलेले नाही. कमी लांबीची नाली बांधून शासनाच्या निधीची अफरातफर झालेली आहे.सदर भ्रष्टाचार व निधीची अफरातफर केल्याची तक्रार एक महिन्यापुर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व खंडविकास अधिकारी लाखनी यांचेकडे करून करण्यात आली. मात्र त्यावर कुठल्याही प्रकारची चौकशी अद्यापही झालेली नाही. ग्रामपंचायत सोमलवाडा मेंढा या ठिकाणी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये सोपवलेली कामे पार पाडण्यात सतत कसूर करून अधिकारांचे अतिक्रमण आणि दुरूपयोग केला गेला आहे. त्यामुळेच तत्कालीन कामात दोषी आढळणाºया सरपंच, उपसरपंच, सचिव व अन्य कर्मचारी अधिकाऱ्यांवर योग्य ती चौकशी करून व दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. मात्र प्रकरण दडपण्याच्या उद्देशाने वरिष्ठ अधिकारी दोषींना पांघरून घालत असल्याचे निवेदनात नमूद आहे. यावर जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकास