बनावट धनादेश स्वाक्षरी प्रकरणी चौकशी सुरू

By Admin | Updated: January 22, 2015 00:34 IST2015-01-22T00:34:08+5:302015-01-22T00:34:08+5:30

मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे बनावट स्वाक्षरीचे धनादेश प्रकरणी सिहोरा पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. यात सचिवाचे बयान नोंदविण्यात आले आहे.

Inquiries in the fake check signature continue | बनावट धनादेश स्वाक्षरी प्रकरणी चौकशी सुरू

बनावट धनादेश स्वाक्षरी प्रकरणी चौकशी सुरू

चुल्हाड : मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे बनावट स्वाक्षरीचे धनादेश प्रकरणी सिहोरा पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. यात सचिवाचे बयान नोंदविण्यात आले आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.
मच्छेरा येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार तथा साहित्य पुरवठाधारकांना देयकाचे धनादेश देताना माजी अध्यक्षाची बनावट स्वाक्षरी धनादेशावर करण्यात आली आहे, असा आरोप माजी अध्यक्ष नोकेश्वर पारधी यांनी केला आहे. या आधी २७ आॅक्टोबर व ६ डिसेंबर २०१४ चे प्रत्येकी १० हजार रूपयाचे धनादेश सिहोऱ्याच्या बँक आॅफ इंडिया शाखेतून वटविण्यात आले आहेत.
यानंतर २४ डिसेंबर २०१४ ला पुन्हा १२ हजार रूपयाचा धनादेश वटविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु या धनादेशवर माजी अध्यक्ष नोकेश्वर पारधी यांनी स्वत:ची स्वाक्षश्री नसून बनावट असल्याने आक्षेप घेतला असता, सदर धनादेश वटविण्यात आलेला नाही. ज्या पुरवठा धारकांनी साहित्य दिले नाही अशा पुरवठा धारकाच्या नावाने ही धनादेश देण्यात आली आहेत. असा आरोप माजी अध्यक्ष पारधी यांनी केला आहे.
दरम्यान, २४ डिसेंबर २०१४ च्या १२ हजार रूपयाच्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी असल्याने हा धनादेश वटविण्यात आलेला नाही. यामुळे या धनादेशवर बनावट स्वाक्षरी कुणी केली, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. दरम्यान सदर धनादेश कुठे आहे. हा आता शोधाचा विषय ठरणार आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा योजनेचे सचिव सुरज टेंभरे यांना पोलिसांनी चौकशी करीता बोलाविले आहे. बँक आॅफ इंडिया शाखेत पोलिसांनी पत्र व्यवहार करण्यास सुरूवात केली आहे. बनावट स्वाक्षरी धनादेश प्रकरणात पोलिसांचा समेमिरा सुरू झाल्याने यात सहभाग असणारेचे धाबे दणाणले आहेत. चौकशीअंती सत्य पुढे येईलच. (वार्ताहर)

Web Title: Inquiries in the fake check signature continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.