वाहकविरूद्ध गुन्हा दाखल न्यायालयात मागितली दाद
By Admin | Updated: October 9, 2016 01:17 IST2016-10-09T01:17:53+5:302016-10-09T01:17:53+5:30
जेष्ठ बस प्रवाशी नागरिकासोबत महिला बस वाहक धक्काबुक्की प्रकरणात महिला वाहकविरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाहकविरूद्ध गुन्हा दाखल न्यायालयात मागितली दाद
तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तुमसर : जेष्ठ बस प्रवाशी नागरिकासोबत महिला बस वाहक धक्काबुक्की प्रकरणात महिला वाहकविरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी जेष्ठ प्रवाशी नागरिकानविरोधात तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जेष्ठ प्रवाशी नागरिकांना न्यायालयात दाद मागितली आहे.
भंडारा-तिरोडा बस क्रमांक एमएच ०७-७६७६ तुमसर बस स्थानकावरून सुटली. या बसमधून जेष्ठ नागरिक सुरेश पे्रमलाल चौबे (६३) रा. लाखनी हे प्रवास करीत होते. चौबे यांनी तुमसर ते बिरसी फाटा तिकीट घेतली. १४ रूपये भाडे दिले. तिकीटामागे उर्वरित ७ रूपये शिल्लक असे महिला वाहकाने लिहीले. तिकीट दिल्यावर वाहकांनी जेष्ठ नागरिकांचे ओळखपत्र मागितले. जेष्ठ नागरिक चौबे यांनी ओळखपत्र बॅगमध्ये आहे असे चौबे यांनी सांगितले.
ओळखपत्र दाखविल्यावर महिला वाहकांनी शिविगाळ करणे सुरू केले. तुम्ही फसवणूक करता असे बोलून चौबे यांना धक्काबुक्की केली. यात गळ्यातील माळ तुटली तथा नखे ओरबडली. त्याच्या जखमा शरीरावर होत्या.
शाब्दीक चकमकीत चौबे यांनी महिला वाहकास तिकीटाचे वरचे पैसे देत असल्याचे सांगितले तरी महिला वाहक ऐकल्या नाही. तुमसर पोलीस ठाण्यात शिवसेनेचे शहर उपप्रमुख मेहताबसिंग ठाकूर चौबे यांना भेटायला गेले. या प्रकाराची तक्रार एस.टी. महामंडळाकडे देण्यात आली. महिला वाहकांवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. महिला बसवाहक उभा उद्धव घाडगे (४५), रा. विद्यानगर भंडारा यांच्या विरोधात भांदवि ५०४, ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तुमसर न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)