तलाठी पदाच्या परीक्षेत परीक्षार्थ्यांवर अन्याय

By Admin | Updated: August 31, 2015 00:31 IST2015-08-31T00:31:32+5:302015-08-31T00:31:32+5:30

तलाठी पदाच्या सरळसेवा भरती २०१५ अंतर्गत १३ सप्टेंबरला म्हणजे वैदर्भीय सण मारबत, तान्हा पोळ्याच्या दिवशी घेतली जाणार आहे.

Injustice to the examinations in the Talathi post | तलाठी पदाच्या परीक्षेत परीक्षार्थ्यांवर अन्याय

तलाठी पदाच्या परीक्षेत परीक्षार्थ्यांवर अन्याय

मारबत, तान्हा पोळ्याला होणार परीक्षा : शेकडो विद्यार्थिनीही मुकणार
तुमसर : तलाठी पदाच्या सरळसेवा भरती २०१५ अंतर्गत १३ सप्टेंबरला म्हणजे वैदर्भीय सण मारबत, तान्हा पोळ्याच्या दिवशी घेतली जाणार आहे. विदर्भात सगळीकडे मारबतीची रॅलीची धुमधाम असते. परिणामी दळणवळणाची साधनेही त्या दिवशी बंदच असतात. नेमक्या त्याच दिवशी पदभरतीची परीक्षा ठेवल्याने विदर्भाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रया उमटत आहे.
विदर्भात ७० टक्के नागरिक हे शेतीवरच उपजिविका करणारे आहेत. त्यामुळे पोळा या सणाला संपुर्ण विदर्भात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. या दिवशी शेतकरी बैलांना पुजतो. पोळा संपला की कितीतरी कर्मचारी सुट्यावर जाणार, त्यामुळे मनुष्यबळाची कमतरताही जाणवू शकते. मात्र आदेश धडकल्याने कदाचीत कर्मचारी उपस्थित राहतील. पंरतू त्या दिवशी सर्व उपहार गृहे चहाटपऱ्या, हॉटेल आदी बंदच राहत असल्याने शिक्षक कर्मचाऱ्याची गैरसोय होईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी मारबत व सायंकाळी तान्हा पोळयाचे आयोजन केले जाते. मारबतीच्या दिवशी शहरात, गावोगावी, गल्लीबोळ्यात मिरवणूक काढली जाते. शहरासह सर्वत्र बंदसदृश वातावरण असत.
बँड, वाजे, डिजेच्या तालावर तरुण मंडळी थिरकताना दिसतात. अशा परिस्थितीत महिलांना घराबाहेर निघणे जरा जिकरीचे होत असतांना पद भरतीची परीक्षा ठेवल्यास त्या मिरवणूकीचा त्रास तर संभवतोच मात्र त्या दिवशी दळणवळणाची साधणे आॅटो, रिक्षा, बस व इतर मिळणे ही कठीनच असल्याने जिल्हयातून व जिल्हा बाहेरील विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचणार कसे, असा सवाल आहे.
सदर तलाठी पद भरतीची परीक्षा ही शाळा, कॉलेज महाविद्यालये अशा ठिकाणीच घेतल्या जाणार आहे. परिणामी या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याकरिता पर्यवेक्षक, समवेक्षक, केंद्रप्रमुख, भरारी पथक इत्यादी कर्मचारी मनुष्यबळाची आवश्यकता असते.
त्याकरिता जिल्हधिकारी कार्यालये तसेच शाळा कॉलेजचे शिक्षक मुख्याध्यापक यांची नियुक्ती होणार.
पोळा सण असल्याने यापैकी या सर्व बाबीचा प्रशासनाने गांभिर्याने विचार करावा व विदर्भीय जनतेच्या भावनाचा तसेच तलाठी पदाच्या परीक्षा उमेदवाराच्या हिताच्या दृष्टिकोनातून व महिलेच्या सुरक्षाचा विचार करुन मारबतीच्या दिवशी घेण्यात येणारी परीक्षा पुढे किंवा मागे ढकलून विदर्भाच्या परीक्षार्थ्यांवर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
पोलिसांवरही अतिरिक्त तणाव
पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा या दिवशी मारबत मिरवणूकही असते. मिरवणुकीत विशेष काळजी घेण्याचे कार्य पोलीस प्रशासनावर असते. पोळा सणामुळे पोलीस सलग दोन दिवस तणावाखाली असतात. त्यात भर म्हणून तलाठी पदाची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर लागणारा बंदोबस्त त्यात महिला पोलिसांनाही जुंपणार आहेत. अशा स्थितीत जर एखादया मिरवणुकीत दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण? असाही प्रश्न उद्भवतो. परिणामी कुठलीही परिक्षेची तिथी ठरविताना भविष्यकालीन घटनांवर किंवा ठरविलेल्या तारखांवर विचारविमर्श केला जातो. परंतु या परीक्षेसाठी मंडळाने विचार केलेला दिसत नाही.

Web Title: Injustice to the examinations in the Talathi post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.