खरबी नाका येथे अपघात, एक जखमी
By Admin | Updated: December 23, 2016 00:30 IST2016-12-23T00:30:38+5:302016-12-23T00:30:38+5:30
भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झाला.

खरबी नाका येथे अपघात, एक जखमी
खरबी (नाका) : भरधाव कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झाला. उद्धव आकरे रा.खरबी नाका (६५) असून त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावर घाटोळे यांच्या घरासमोर घडली.
खरबी-नाका येथे जवाहरनगर सावरी येथील रामकुमार गजभिये यांच्या मुलगा नागपूर विमानतळावर जाण्यासाठी निघाला असता खरबी नाका येथे भरधाव वेगाने कार क्रमांक एमएच ३६ एच ४०८७ ही समोरील दुचाकी क्र. एमएच ३६ ई ८०९६ ने जबर धडक दिल्यामुळे हा अपघात घडला होता.
या दरम्यान वाहन पाच फुट उंच उडून खाली पडला. त्यामुळे दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेची जवाहरनगर पोलिसांची नोंद केली असून कार चालक राजु रंगारी यांना ताब्यात घेतले असून तपास उपनिरीक्षक प्रिती आळे हे करीत आहेत. (वार्ताहर)