‘बीपीएल’चा हवाला देत माहिती नाकारली

By Admin | Updated: December 12, 2015 00:41 IST2015-12-12T00:41:41+5:302015-12-12T00:41:41+5:30

दारिद्र्यरेषेखाली असतानाही अर्जदाराला दारिद्र्यरेषेखाली येत नसल्याची सबब पुढे करून माहिती नाकारल्याचा प्रताप भंडारा एस.टी. महामंडळाने केला आहे.

The information refuted 'BPL' was denied | ‘बीपीएल’चा हवाला देत माहिती नाकारली

‘बीपीएल’चा हवाला देत माहिती नाकारली

एसटी महामंडळाचा अजब फतवा अर्जदाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार, निर्णयाकडे नजरा
भंडारा : दारिद्र्यरेषेखाली असतानाही अर्जदाराला दारिद्र्यरेषेखाली येत नसल्याची सबब पुढे करून माहिती नाकारल्याचा प्रताप भंडारा एस.टी. महामंडळाने केला आहे. माहिती देण्यासाठी महामंडळाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा अर्जदाराने केला आहे.
येथील खात रोडवरील रहिवासी सुभाष दादा ठाकरे हे एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. एका अपघात प्रकरणी महामंडळाने ठाकरे यांची सेवा समाप्त केली आहे. त्यांनी ७ आॅक्टोबर २०१५ रोजी जनमाहिती अधिकारी कर्मचारी वर्ग (वाहतूक अधिकारी) राज्य परिवहन महामंडळ भंडारा यांना वर्ष २००९ ते २०१५ अखेर प्राणांतिक अपघात प्रकरणी सक्षम अधिकारी विभागीय वाहतूक अधिकारी यांनी बजावलेली शिक्षा अपघात प्रकरणाचा तपशिल माहिती अधिकारात मागितला होता. परंतु, महामंडळाने माहिती देण्याऐवजी अर्जदार हा दारिद्रय रेषेखाली येत नसल्याने विनामुल्य प्रत देता येत नसल्याचे म्हटले आहे.
अर्जदार सुभाष ठाकरे यांची भंडारा नगर परिषद कार्यालयात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव आहे. तसे प्रमाणपत्रसुद्धा ठाकरे यांनी महामंडळाकडे सादर केले. परंतु, महामंडळाकडून जाणीवपूर्वक माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आता सुभाष ठाकरे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.(नगर प्रतिनिधी)

Web Title: The information refuted 'BPL' was denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.