महागाईने ओतले तेल, गृहिणींचे बजेट बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:28+5:302021-09-08T04:42:28+5:30
इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच घटकावर झाला आहे. किरणा साहित्याचे दरही वाढले आहे. ११५ रुपये किलाे असणारे खाद्यतेल आता १६५ ...

महागाईने ओतले तेल, गृहिणींचे बजेट बिघडले
इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच घटकावर झाला आहे. किरणा साहित्याचे दरही वाढले आहे. ११५ रुपये किलाे असणारे खाद्यतेल आता १६५ ते १७० रुपयांपर्यंत पाेहाेचले आहे. धान्य व इतरही वस्तू वाढत आहेत. गॅस सिलिंडरनेही त्यात आणखी भर घातली आहे. सर्वांचे गणित बिघडले असून महागाई कमी हाेण्याचे नाव घेत नाही.
बाॅक्स
डाळीशिवाय वरण
माेठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने दरराेजच्या जेवणात डाळीचा उपयाेग केला जाताे. डाळीचे दर वाढल्याने आता दरराेजच्या जेवणातून डाळ गायब हाेऊन आठवड्यातून एक-दाेन दिवसांवर आली आहे. तुरीची डाळ ११० रुपये किलाे आहे.
बाॅक्स
सिलिंडर हजाराच्या घरात
सिलिंडर दरमहा वाढत आहे. गत आठवड्यात सिलिंडरच्या किमतीत पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली. ते आता ९४६ रुपयांचे झाले आहे. ४६० रुपयांत मिळणारे सिलिंडर आता हजारापर्यंत जाऊन पाेहाेचले आहे. त्यामुळे दरमहा खर्च वाढत आहे.
गृहिणी म्हणतात...
कितीही काटकसर केली तरी किरणा कमी करता येत नाही. जेवढे लागेल तेवढे आणावेच लागते. पूर्वी आमच्याकडे चार हजारांचा किराणा लागायचा, आता ताे दरमहा सहा हजारांपर्यंत जाताे.
- सीमा शाहू, लाखनी
किराणाचा खर्च वाढत आहे. अनावश्यक गाेष्टीला फाटा देऊन किरणा घेतला जात आहे; परंतु जीवनावश्यक वस्तू तर खरेदी कराव्या लागताच. तेल, धान्य, डाळी याशिवाय कसे भागणार. महागाईने सर्व गणित बिघडले आहे.
- कविता दलाल, भंडारा